manisha mhaiskar transferred to protocol department | Sarkarnama

मनिषा म्हैसकर-पाटणकर यांची राजशिष्टाचार विभागात बदली

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

...

पुणे : राज्य सरकारने आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात नगरविकास विभागातील प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची बदली आता राजशिष्टाचार विभागात करण्यात आली आहे. मनिषा म्हैसकर यांना फडणवीस सरकारच्या काळात महत्त्वाचे स्थान होते. त्यांचे पती मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

पुणे परिवहन महामंडळावर येण्यास नाखूष असलेले रायगडचे जिल्हाधिकारी व्ही. एन. सूर्यवंशी यांची नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तापदी झाली आहे. नगरविकास या महत्त्वाच्या खात्यात महेश पाठक यांना आता जबाबदारी देण्यात आली आहे. 

1.श्री डी एम मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी परभणी या पदावर 

2. डॉ व्ही एन सूर्यवंशी यांची नियुक्ती महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण या पदावर कल्याण या पदावर 

3.श्री सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांची नियुक्ती आयुक्त पशुसंवर्धन पुणे या पदावर

4. श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर प्रधान सचिव नगर विकास विभाग यांची नियुक्ती प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी

5. श्रीमती जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई

6. श्री एम. डी. पाठक प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-2 या पदावर

7. श्री एम देवेन्‍द्र सिंह महापालिका आयुक्त लातूर महानगरपालिका लातूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यवतमाळ या पदावर
 
8. श्री सी.के. डांगे सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची नियुक्ती महापालिका आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका या पदावर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख