manirao kokate dismiss from bjp | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भाजपने कोकाटेंची हकालपट्टी केल्याने शिवसेनेला दिलासा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 एप्रिल 2019

नाशिक : राजकीय अस्तित्वासाठी बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माघारीसाठी सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. त्यामुळे आज भाजपने त्यांची हाकालपट्टी केल्याने शिवसेनेला दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे. 

नाशिक मतदारसंघातून बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविणारे कोकाटे यांची अखेर पक्षाने हकालपट्टी केली आहे. एरव्ही पक्षांकडून शिस्त म्हणून निलंबित करण्याची प्रथा आहे. मात्र कोकाटे यांच्या बाबतीत हकालपट्टी असा शब्द वापरण्यात आला आहे. 

सिन्नर विधानसभा मतदार संघाचे तीनदा प्रतिनिधित्व केलेल्या कोकाटे यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापुर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, 
शिवसेना त्यानंतर पुन्हा कॉंग्रेस आणि सध्या भाजप असा पक्षानुरुप राजकीय प्रवास करणाऱ्या कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याचा शब्द दिला होता. 

गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरु केली होती. परंतू लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापुर्वी भाजप व शिवसेनेची युती झाली. त्यामुळे कोकाटे यांना माघार घेण्याची वेळ आली होती. मात्र आता थांबलो तर राजकारणातून निवृत्त व्हावे लागेल असा कयास बांधत कोकाटे यांनी नाशिकची जागा भाजपला सोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि शिर्डी या दोनच मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे ती मागणी पुर्ण होऊ शकली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांसह प्रमुख नेत्यांनी कोकाटे यांच्यावर कारवाईसाठी दबाव आणला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख