manipur minister | Sarkarnama

मणिपूरच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

गुवाहाटी (मणिपूर) : आपल्या मंत्रालयात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत मणिपूरचे आरोग्यमंत्री एल. जयंतकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. 

गुवाहाटी (मणिपूर) : आपल्या मंत्रालयात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत मणिपूरचे आरोग्यमंत्री एल. जयंतकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. 

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. त्यामध्ये मणिपूरचाही समावेश होता. मणिपूरमध्ये भाजपला 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मिळवावे लागले. तरीही भारतीय जनता पक्षाने नागालॅंड पीपल्स फ्रंट (एनपीपी), लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) आणि एका अपक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. एनपीपीचे जयंतकुमार यांना आरोग्यमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र आपल्या मंत्रालयात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी भुवनेश्‍वरला आहेत. त्यामुळे अद्याप राजीनाम्यावर विचार होऊ शकलेला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख