माणिकराव ठाकरेंपुढे बंजारा मतपेटीचे आव्हान?

कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचे नाव यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी आघाडीवर असले तरी बंजारा मतपेटीकडे कॉंग्रेसला दुर्लक्ष करता येणार नाही. या समाजाचे डॉ. टी. सी. राठोड यांनी ठाकरे यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यांच्या नावाचा पुन्हा पुनर्विचार सुरू झाल्याचे समजते.
माणिकराव ठाकरेंपुढे बंजारा मतपेटीचे आव्हान?

यवतमाळ : कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचे नाव यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी आघाडीवर असले तरी बंजारा मतपेटीकडे कॉंग्रेसला दुर्लक्ष करता येणार नाही. या समाजाचे डॉ. टी. सी. राठोड यांनी ठाकरे यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यांच्या नावाचा पुन्हा पुनर्विचार सुरू झाल्याचे समजते.

यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ पारंपारिक कॉंग्रेसचा मतदारसंघ मानला जातो. यात कुणबी व बंजारा समाजाचे प्राबल्य अधिक आहे. बंजारा समाज हा पारंपारिकपणे कॉंग्रेसकडे ओढा असणारा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वामुळे हा समाज प्रामुख्याने कॉंग्रेसशी बांधलेला होता. सुधाकरराव नाईक यांच्या निधनानंतर या मतपेटीलाही जबर धक्का बसला आहे. त्यात गटबाजीच्या राजकारणाने कॉंग्रेस पक्ष जिल्ह्यात पुरता पोखरला गेला आहे. भावना गवळी यांचा जनसंपर्क व विकासाच्या आघाडीवरही सामसूम असतानाही कॉंग्रेसला त्या नेहमीच धोबीपछाड देण्यात यशस्वी होत आहे.

या मतदारसंघातून पुन्हा माणिकराव ठाकरे यांचे नाव समोर आल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ठाकरे कॉंग्रेसचे उमेदवार राहिल्यास पुन्हा हा मतदारसंघ भावना गवळींना आंदण दिल्यासारखे होईल, यामुळे या मतदारसंघात दुसरा उमेदवार द्यावा, यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे. यात डॉ. टी. सी. राठोड यांचे नाव समोर आले आहे. कॉंग्रेसने केलेल्या सर्वेक्षणातही डॉ. राठोड यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. त्यांची प्रतिमा चांगली असून बंजारा समाजाच्या मदतीने ते कॉंग्रेसला यावेळी यश मिळवून देऊ शकतात, असे बोलले जात आहे. डॉ. राठोड यांना वगळून ठाकरे यांनाच उमेदवारी दिल्यास कॉंग्रेसला बंजारा मतपेटीवर भरवसा ठेवता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com