`कॉंग्रसने `वंचित'ला भाजपची बी टीम का म्हटले, हे आधी सांगा'

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि विजय वड्डेटीवार गेले होते.
`कॉंग्रसने `वंचित'ला भाजपची बी टीम का म्हटले, हे आधी सांगा'

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि विजय वड्डेटीवार गेले होते.   त्यावेळी कॉंग्रेसने `वंचित'ला भाजपची बी टीम का म्हटले, याचे आधी उत्तर द्यावे, असे आंबेडकर यांनी त्यांना विचारले. त्यावर उद्या संध्याकाळपर्यंत कॉंग्रेस उत्तर देणार आहेत.  

आंबेडकर यांनी उपस्थित केलेले विविध मुद्दे पुढीलप्रमाणे : 
- मी कलम ३७० बद्दल काही भूमिका मांडली, त्याबद्दल काँग्रेसची भूमिका काय हे मला समजत नाही 
- काँग्रेस कलम ३७० वर वेगवेगळी भूमिका घेतंय. 
त्यामुळं त्यांची योग्य भूमिका काय हे कळत नाही 
- युतीबद्दलही चर्चा झाली; पण त्यांनी आमच्या पक्षाला बी टीम का म्हटलं याचं उत्तर आधी द्यावं 
-बी टीमचं उत्तर आल्याशिवाय पुढे काहीही चर्चा होऊ शकत नाही 
-उद्या संध्याकाळपर्यंत ते उत्तर देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com