मनसेच्या ठाकरेंना कॉंग्रेसचे ठाकरे भेटले 

 मनसेच्या ठाकरेंना कॉंग्रेसचे ठाकरे भेटले 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका होती म्हणून समाधान व्यक्त करण्यासाठी मी आज त्यांची भेट घेतली अशी माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज मुंबईत माध्यमांना दिली 

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीला चोवीस तासही उलटत नाहीत तोवर कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनीही राज यांची भेट घेतली आहे. वास्तविक कॉंग्रेसने राज यांच्याबरोबर जाण्यास यापूर्वीच नकार दिला होता. आज मात्र दोन ठाकरे एकत्र आल्याने कॉंग्रेसमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सपाटून मार खाला आहे. गेल्या दोन खासदार निवडून आले होते यावेळी एकच खासदार कॉंग्रेसचा निवडून आला आहे. राष्ट्रवादीने त्यातल्या त्यात बरी कामगिरी करताना पाच खासदार निवडून आणले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा विजय खेचून आणल्याने आघाडीच्या नेत्यांना धक्का बसला होता. 

आगामी विधासभेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, राजू शेट्टींचा स्वाभिमानी आणि राज ठाकरेंची मनसे पुन्हा हातात हात घालून नव्या दमाने लढण्यास सज्ज झाले आहेत. कॉंग्रेसला मात्र अजूनही मनसेची ऍलर्जी आहे. राष्ट्रवादी मात्र मनसेला बरोबर घेण्यास तयार आहे. विधानसभा निवडणुकीत युतीच्या पाडाव्यासाठी विरोधक एकत्र आल्यास वेगळे चित्र राज्यात दिसू शकते असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. 

माणिकराव ठाकरे यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छाअसल्याचे सांगण्यात येत असेल तरी कॉंग्रेस नेत्याच्या या भेटीने चर्चेला सुरुवात केली आहे. विधान सभेसाठी मनसेला आघाडीत घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. 

या भेटीविषयी माणिकराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की हो मी राज यांनी भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या मोदी शहा विरोधी भूमिकेबाबत एक विचार असल्याने ही भेट घेतली. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ शकतोच असे नाही. राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे का ? याचा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com