छगन भुजबळांकडे उमेदवारी मागणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माणिकराव शिंदेंची शिवसेना नेत्यांसोबत बैठक 

शहरातील पाथर्डी फाटा येथील तारांकीत हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासमवेत बंद दाराआड बैठक झाली. यावेळी येवला मतदारसंघातील शिवा सुरवसे, शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते यांसह नाशिकचे काही नेते उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांनी भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेला मदत करावी असा आग्रह धरला.
 छगन भुजबळांकडे उमेदवारी मागणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माणिकराव शिंदेंची शिवसेना नेत्यांसोबत बैठक 

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात जाहिरात देऊन उमेदवारीची मागणी करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माणिकराव शिंदे यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरुच आहेत. चार दिवसांपूर्वी नाशिकच्या एका तारांकीत हॉटेलमध्ये शिवसेना नेत्यांसमवेत बंददाराआड चर्चा केली. या बैठकीसाठी येवल्याच्याच एक नेत्याने पुढाकार घेतल्याचे विश्‍वासनिय सुत्रांनी सांगितले. मात्र, या बैठकीत शिंदे यांनी शिवसेनेला मदत करावी असा प्रस्ताव शिवसेना नेत्यांनी दिल्याचे कळते. आधीच शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या बैठकीमुळे पक्षातील नेते मात्र अस्वस्थ झाले. 

शहरातील पाथर्डी फाटा येथील तारांकीत हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासमवेत बंद दाराआड बैठक झाली. यावेळी येवला मतदारसंघातील शिवा सुरवसे, शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते यांसह नाशिकचे काही नेते उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांनी भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेला मदत करावी असा आग्रह धरला. तर  शिंदे यांनी उमेदवारी मिळेल का याचीची चाचपणी करुन पाहिली. मात्र याविषयीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. त्यामुळे त्याबाबत त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही. या बैठकीविषयी शहरातील शिवसेना नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. 

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी उपमुंख्यमंत्री छगन भुजबळ विरोधकांची राजकीय जमवा जमव सुरु झाली आहे.  त्यातून काही मोठ्या घडामोडीही घडण्याची शक्‍यता आहे. मात्र येवला मतदारसंघात शिवसेनेकडून गेल पाच वर्षे मतदारसंघ प्रमुख संभाजी पवार, पंचायत समितीचे उपसभापाती भागवत, विंचुरचे शिवा सुरवसे हे इच्छुक आहेत. त्यात नव्या इच्छुकाची भर पडल्याने शिवसेनेतील इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. ऐनवेळी  शिंदे यांनी उमेदवारीची अट घालून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यास अनेकांची अडचण होणार आहे. त्याचा शिवसेनेला लाभ कमी व हानी अधिक होण्याचीच बिती व्यक्त होत आहे. त्यामुळे भुजबळांएैवजी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी जाहिरात देऊन मागणी करणाऱ्या शिंदे यांच्या ताज्या भूमिकेने राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षांत नाराजी आहे. 

छगन भुजबळ येवला मतदारसंघातून 2004, 2009 आणि 2014 असे सलग तिनदा मोठ्या मताधिक्‍यानी विजयी झाले आहेत. 2009 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केलेल्या माणिकराव शिदे यांचा तर 2014 मध्ये संभाजी पवार यांचा चाळीस हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परतल्यावर यंदा पुन्हा शिंदे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे भुजबळ यांचा येवला मतदारसंघ राज्यभर चर्चत आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com