माणिकराव कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीच्या आव्हानाने नाशिकमध्ये रंगत

शिवसेना, भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. गोडसे यांनी आज पक्षप्रमुखांची भेट घेतली. मात्र, मतदारसंघात वातावरण निवळलेले नाही. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी "मी अपक्ष उमेदवारी करणारच," असा पुनरुच्चार केला. भाजपने मला 'एबी फॉर्म' देऊन या मतदारसंघात शिवसेना, भाजप मध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी अजब मागणी त्यांनी केली.
माणिकराव कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीच्या आव्हानाने नाशिकमध्ये रंगत

नाशिक : शिवसेना, भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. गोडसे यांनी आज पक्षप्रमुखांची भेट घेतली. मात्र, मतदारसंघात वातावरण निवळलेले नाही. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी "मी अपक्ष उमेदवारी करणारच," असा पुनरुच्चार केला. भाजपने मला 'एबी फॉर्म' देऊन या मतदारसंघात शिवसेना, भाजप मध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी अजब मागणी त्यांनी केली.

गेले काही दिवस भाजपतर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी करणारे सिन्नरचे माजी आमदार कोकाटे यांची शिवसेना, भाजप युतीची घोषणा झाल्यावर हिरमोड झाला. मात्र, त्यांनी प्रयत्न न सोडता नेत्यांच्या गाठीभेटी सुरु ठेवल्या होत्या. प्रारंभी नाशिकची जागा भाजपने आपल्याकडे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेसह विविध नेत्यांच्या गाठीभेटी सुरु ठेवत मतदारसंघात कार्यकर्ते, समर्थकांद्वारे "तुम्ही बांधाल ते तोरण, सांगाल ते धोरण, यंदा दिल्ली गाठायचीच'' असे फलक लावले होते. भारतीय जनता पक्षाने त्यांना युती धर्म पाळण्याच्या सुचना दिल्या. शुक्रवारी खासदार हेमंत गोडसे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर कोकाटे यांनी उमेदवारीचा हट्ट सोडणे अपेक्षीत होते.

या पार्श्‍वभूमीवर कोकाटे, म्हणाले, ''शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्याने काहीच फरक पडत नाही. कारण मी शिवसेनेकडे उमेदवारी मागीतलीच नव्हती. मला भाजपची उमेदवारी हवी होती. त्यावर मी अद्यापही ठाम आहे. भाजपने मला 'एबी' फॉर्म द्यावा. नाशिक मतदारसंघात शिवसेना, भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी. माझा विजय निश्‍चित आहे. मी अपक्ष उमेदवार राहणारच," असा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ, शिवसेना, भाजप युतीचे हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार याशिवाय अपक्ष कोकाटे असा चौथा रंग भरला आहे.

कोकाटे यांचा २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याकडून पराभव झाला होता. आता शिवसेना, भाजप युती असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे असेल. अशा स्थितीत लोकसभेची संधी हुकल्याने विधानसभेसाठी मतदारसंघात आपला गट टिकवुन ठेवण्यासाठी त्यांना कार्यकर्ते शिवसेनेकडे जाता कामा नये व विरोधासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही वळु नयेत, असे प्रयत्न आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाला रंजक वळण मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com