मंगळवेढ्यात काळुंगे, आवताडे यांचे `एकला चलो रे'

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांमध्ये कोणाला संधी मिळणार यामध्ये अनिश्चितता असली तरी मंगळवेढ्यात मात्र सध्या `एकला चलो रे'ची भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
मंगळवेढ्यात काळुंगे, आवताडे यांचे `एकला चलो रे'

मंगळवेढा - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांमध्ये कोणाला संधी मिळणार यामध्ये अनिश्चितता असली तरी मंगळवेढ्यात मात्र सध्या `एकला चलो रे'ची भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

`राष्ट्रवादी'च्या स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मंगळवेढा मतदारसंघ पुर्नरचनेनंतर पंढरपूरला जोडला गेला. त्यात पहिल्यांदाच या ठिकाणी  स्वाभिमानी पक्षाकडून आमदार भालके यांना आमदार होण्याची संधी मिळाली. परंतु दुसऱ्या टर्ममध्ये काँग्रेसमधून आमदार झाले. परंतु  आमदारकीची हॅट्रीक मात्र कोणत्या पक्षातून करणार हे मात्र अजून अनिश्चित आहे. 

सध्या काँग्रेसमधून शिवाजीराव काळुंगे यांनी विधानसभेचे संभाव्य उमेदवार गृहीत धरून कामाला लागले आहेत. परंतु त्यांच्या सोबतीला काँग्रेसमधील इतर कोणीही पदाधिकारी दिसत नाही. काँग्रेसचे आमदार असताना दोन गट कार्यरत आहेत. यामध्ये आमदार भालके यांना मानणारा व जुन्या काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांचा गट, या गटाची दुफळी काँग्रेसच्या संघर्ष मेळाव्यात दिसून आली. 

सध्या काळुंगेनी मात्र इतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत न घेता स्वतः मतदारांच्या भेटी घेऊन कानोसा घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे अजुनही शिवसेनेत असल्याने आपणाला उमेदवारी मिळेल अशा हिशोबाने कामाला लागले. गाव भेट दौरा सुरू केला आहे. जलसंधारण मंत्री ना. तानाजीराव सावंत यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळणार या शक्यतेने जि. प.सदस्या शैला गोडसे यांना मतदारसंघात सक्रिय केले आहे. अशा परिस्थितीत आ. प्रशांत परिचारक यांचा गट सक्रिय नाही तर आ. भालकेंनी देखील अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे मंगळवेढ्यातील इच्छुकांना पक्ष चिन्हावरील संधी वरिष्ठ नेत्यांकडून ठरवली जाणार आहे अन्यथा अपक्ष लढावे लागणार आहे. आवताडेंकडे यंत्रणा आहे. 

अशा परिस्थितीत तरी मंगळवेढ्याच्या दोन नेत्यांनी मात्र `एकला चलो रे' भूमिका कायम ठेवत मतदारांमध्ये जात आहेत. परंतु मतदारांमध्ये मात्र तालुक्यामध्ये अनेक प्रश्न रेंगाळले असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला सर्वसामान्याला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मतदारांमध्ये कोणाला संधी द्यायची आहे यामध्ये यामध्ये देखील घालमेलीचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com