पत्नीला पुणे झेडपी अध्यक्ष बनविण्यासाठी मंगलदास बांदलांची मोर्चैेबांधणी

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठरल्याने त्यासाठी आतापासूनच नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात बांदल यांनी आघाडी घेऊन आपला दावा जाहीर केला.
mangaldas bandal tries for pune zp president
mangaldas bandal tries for pune zp president

शिक्रापूर : राष्ट्रवादीचा खासदार शिरूरमधून निवडून दिला. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मदत होईल अशीच भूमिका घेतल्याने शिरुर-हवेलीसह आंबेगाव-शिरुरमध्ये विधानसभेसाठीही यश मिळाले. पर्यायाने पक्षाने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी दावेदार असून तशी रितसर मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेकडे केल्याची माहिती आज तातडीने जिल्हा परिषद सदस्या सौ. रेखा मंगलदास बांदल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी यासाठी कारणेही स्पष्ट केली. सन २००४ पासून राष्ट्रवादीसाठी चटका लावणारी निवडणूक म्हणजे पूर्वीच्या खेड व सन २००९ पासून शिरुर लोकसभा निवडणूक होती. कारण या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीला पराभूत केले होते. शिवाय सन २०१४च्य निवडणूकीत शिरुरमधून कुणी इच्छुक नसताना पती मंगलदास बांदल पुढे होवून इच्छुक झाले होते. मात्र पक्षाने डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्यावर बांदल यांनी मुख्य प्रचारक म्हणूनही काम करुन विजय मिळवून दिला, असा दावा त्यांनी केला.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही आंबेगाव-शिरुर तसेच शिरुर-हवेली या दोन्ही मतदारसंघात पक्षासाठी भरीव योगदान दिल्याने दोन्ही जागाही पुन्हा राष्ट्रवादीला मोठ्या मताधिक्याने मिळाल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर पती बांदल यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकांसाठी स्वत: थांबून पक्षहिताला प्राधान्य दिले. या शिवाय याच काळात जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर संधी देण्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हा बांदल कुटुंबीयांना दिल्याने आता मी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असून तसा दावा मी लेखी स्वरुपात प्रदेश उपाध्यक्ष बांदल यांच्या मार्फत जयंत पाटील यांचेकडे केल्याची माहितीही सौ.बांदल यांनी दिली.

दरम्यान याबाबत आपण समर्थकांसह लवकरच जेष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचा दावा सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com