bandal ff.
bandal ff.

मंगलदास बांदल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता

पुणे : खंडणी मागितल्या व धमकी दिल्याप्रकरणी अटक केलेल्या मंगलदास बांदल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज देण्यात आली. मात्र ते घसादुखीचा त्रास झाल्यामुळे ते अद्याप ससून रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर त्यांना येरवडा कारागृहात दाखल करण्यात येईल.

पुण्यातील एका सराफाला तब्बल 50 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी बांदल यांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर बांदल यांना न्यायालयात हजर करण्याच्या आगोदर नियमित वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या सोमवारी ससूनमध्ये दाखल केले होते.मात्र बांदल यांचा घसा खराब झाल्यामुळे ससून रुग्णालयाने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले. 

सध्या कोरोनाचे मोठे सावट संपूर्ण देशावर आहे. बऱ्याच ठिकाणी न्यायालयाच्या निर्देशानुसार तात्पुरत्या पॅरोलवर बऱ्याच गुन्हेगारांना बाहेर सोडण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्याच पार्श्वभूमीवर बांदल यांच्या घशात दुखू लागल्याने त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे. बांदल यांच्यावर राष्ट्रवादीने देखील कारवाई करत यापूर्वीच त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com