mangala bansoade helps flood affected people | Sarkarnama

तमाशा कलावंत मंगला बनसोडे धावल्या पूरग्रस्तांच्या मदतीला

संपत मोरे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पुणे : सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि त्याचे सुपुत्र नितीन कुमार बनसोडे हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी आज सकाळी आपल्या करवडी (ता. कराड) या गावातून पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.

बनसोडे यांनी 5000 जणांचे अन्नधान्य, 1500 फूड पॅकेट आणि पाणी बाटली, 100 साडया आणि  200ब्लॅकेट, चादरी ,कपडे पूरग्रस्तांना पोहोचवली आहेत. 

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की हे सगळ्यांवर आलेलं संकट आहे. या संकटाशी आपण मिळुन मुकाबला करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले तर आपण त्याना सावरू.त्याना उभे करू."

तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या बनसोडे कुटूंबाने आजवर नैसर्गिक आपत्ती आल्यावर ती सावरण्यासाठी योगदान दिले आहे. आताही हे कुटूंब पूरग्रस्ताच्या पाठीशी उभे राहिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख