Maneka Gandhi Visits Yavatmal Sangh Office | Sarkarnama

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची यवतमाळ संघकार्यालयाला भेट

चेतन देशमुख
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यवतमाळ येथील आहेत. गांधी घराण्याचे आध्यात्मिक गुरू म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक महावीर नगर परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. त्यांची भेट घेण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेत्या मनेका गांधी यवतमाळ येथे आल्या होत्या. नागपूर वरुण वाहनाने दुपारी 12.30 ला त्यांनी यवतमाळ येथे प्रेमासाई महाराज यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यवतमाळ : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजप नेत्या मनेका गांधी यांनी आज (ता.11) यवतमाळ येथील संघ कार्यालयाला भेट दिली. त्यांचे आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांची भेट घेण्यासाठी गांधी यवतमाळात आल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांचा हा दौरा अत्यंत गोपनीय होता.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यवतमाळ येथील आहेत. गांधी घराण्याचे आध्यात्मिक गुरू म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक महावीर नगर परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. त्यांची भेट घेण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेत्या मनेका गांधी यवतमाळ येथे आल्या होत्या. नागपूर वरुण वाहनाने दुपारी 12.30 ला त्यांनी यवतमाळ येथे प्रेमासाई महाराज यांच्या निवासस्थानी भेट दिली.

महाराजांसोबत सामाजिक विषयावर त्यांची चर्चा झाली. त्यानंतर महाराजांच्या घरीच त्यांनी भोजन घेतले. 2.30 वाजेपर्यंत भाजप नेत्या मनेका गांधी शहरात होत्या. नागपूर परत जाताना अवद्युत वाडी येथील संघ कार्यालयाला त्यांनी भेट दिली. संघ परिवारातील सदस्यांशी त्यांनी चर्चा करून नागपूर कडे रवाना झाल्या. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचा हा यवतमाळ दौरा खासगी स्वरूपाचा असल्याने अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली. 

वरुण गांधी घेणार भेट
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रेमासाई महाराज यांची आज (ता.11) यवतमाळ येथे प्रेमासाई महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर यांचं महिण्यात भाजपचे खासदार वरुण गांधी देखील प्रेमासाई महाराज यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख