maneka gandhi target rahul priyanka | Sarkarnama

राहुल-प्रियंका बच्चे, त्यांना खूप काही शिकावं लागले, काकी मनेका गांधींचा टोला 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

नवी दिल्ली : " राजकारण हा काही पोरखेळ नाही. कॉंग्रेसने प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही, राहुल आणि प्रियंका हे अद्याप लहान आहेत. त्यांना खूप शिकावे लागेल,'' असा टोला भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी लगावला आहे.मनेका या राहुल-प्रियंका यांच्या काकू आहेत. 

वास्तविक मनेका गांधी आणि वरूण गांधी भाजपमध्ये असले तरी ते कधी सोनिया गांधी, प्रियंका किंवा राहुल यांच्यावर टीका करीत नाहीत. तसेच सोनिया, राहुल,प्रियंकाही तेच पथ्य पाळतात. हे सर्वजण गांधी-नेहरू घराण्याचे वारसदार आहेत.

भाजपची मंडळी नेहमीच पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते राजीव गांधी यांच्यापर्यंत सर्वांना लक्ष करतात तरीही ते कधी "ब्र' काढत नाहीत किंवा नाराजीही व्यक्त करीत नाही. गप्प बसणे आणि भाजपला न दुखावणे हे धोरण भाजपमध्ये राहिल्याने त्यांनी स्वीकारलेले दिसते. 

यंदाच्या लोकसभेत कॉंग्रेसचा सलग दुसऱ्यावेळी दारूण पराभव झाला. गांधी-घराण्याचा मतदारसंघ म्हणून ज्या अमेठीकडे पाहिले जाते त्या अमेठीत राहुल यांचा झालेला पराभव मनेका यांच्या जिव्हारी लागलेला दिसतो. त्यांनी कॉंग्रेस आणि राहुल-प्रिंयंकांवर पराभवाचे खापर फोडले आहे.

मनेका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की राजकारण करायचे असेल तर ते गंभीरपणे करायला हवे. केवळ गाडीत बसून हात उंचावून राजकारण करता येणार नाही. राजकारण हा काही पोरखेळ नाही. विशेषत: राहुल गांधींनी खूप काही शिकण्याची गरज आहे. कॉंग्रेसच्या पराभवाला तेच जबाबदार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख