Manda_Mhatre
Manda_Mhatre

बेलापूरमधून मंदा म्हात्रेंनाच संधी !

..

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि त्यांचे वडील गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे बेलापूर विधानसभा मतदार संघावर निर्माण झालेले उमेदवारीचे सावट अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे . 

 बूधवारी सकाळी संदीप नाईक यांच्या प्रवेशाप्रसंगी बेलापूर विधानसभेवर आमदार मंदा म्हात्रे यांनाच संधी देणार असल्याचे पुनरूच्चार फडणवीस यांनी केला. त्यामुळे आपल्यावर अन्याय होणार नसून प्रवेश करणाऱ्यांनाही थेट संदेश मिळाला असल्याची प्रतिक्रीया म्हात्रे यांनी दिली. 

नवी मुंबईसह राज्यभरात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये भाजप प्रवेशाची लाट निर्माण झाली आहे. या लाटेवर नवी मुंबईतून गणेश नाईक व त्यांचे पुत्र संदीप नाईक हे देखील स्वार झाले आहेत. मात्र नाईकांच्या या प्रवेशामुळे बेलापूर मतदार संघ जाणार अशी परिस्थिती काही लोकांकडून निर्माण केली जात होती. 

तसेच नाईक आल्यावर मंदा म्हात्रेंचे पूर्नवसन कसे होणार असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले होते. मात्र या सर्व प्रश्‍नांना फडणवीस यांनी सकाळी मुंबईत झालेल्या प्रवेशाच्या कार्यक्रमात म्हात्रे यांना धीर दिला. संदीप नाईक यांच्या प्रवेशानंतरही बेलापूर मतदार संघ अबाधित राहणार असल्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी आपल्याला दिल्याचे प्रतिक्रीया म्हात्रे यांनी दिली. 

राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक भाजपता येणार असल्याने पुन्हा एकदा निष्ठावंतांची गळचेपी होणार असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकारी धास्तावले होते. मात्र फडणवीस यांनी म्हात्रे यांना बेलापूर मतदार संघाचे आश्‍वासन देऊन पुन्हा भाजपमध्ये चिघळलेले वातावरण शांत केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com