ऐरोली, बेलापूरात कमळ फुलले मंदा म्हात्रेंचा सलग दुसरा विजय; गणेश नाईकांचा करिष्मा कायम

विधानसभा निवडणूकीत भाजपला नवी मुंबईतील दोन्ही जागा जिंकल्या आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या 43 हजार 597 मतांनी सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. भाजपमध्ये आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे देखील ऐरोली मतदार संघातून 78 हजार 491 मतांनी निवडून आले. म्हात्रेंपाठोपाठ नाईकांचाही ऐरोलीतून विजय झाल्यामुळे संपूर्ण नवी मुंबई आता भाजपमय झाली. म्हात्रे आणि नाईक यांच्या विजय रथासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचा अक्षरशः धुव्वा उडाला.
Manda Mhatre - Ganesh Naik
Manda Mhatre - Ganesh Naik

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीत भाजपला नवी मुंबईतील दोन्ही जागा जिंकल्या आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या 43 हजार 597 मतांनी सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. भाजपमध्ये आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे देखील ऐरोली मतदार संघातून 78 हजार 491 मतांनी निवडून आले. म्हात्रेंपाठोपाठ नाईकांचाही ऐरोलीतून विजय झाल्यामुळे संपूर्ण नवी मुंबई आता भाजपमय झाली. म्हात्रे आणि नाईक यांच्या विजय रथासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचा अक्षरशः धुव्वा उडाला.

बेलापूरची जागा नक्की कोणाला मिळणार? यावरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. मात्र, जागा पटकावण्यात भाजप यशस्वी ठरल्यामुळे मंदा म्हात्रेंचा विजय त्या दिवशी निश्‍चित झाला होता. परंतू, शिवसेनेच्या इच्छूक नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे काही शिवसैनिकांनी मंदा म्हात्रेंना या प्रचारात मदत न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेच्या उमेदवाराला छुपी मदत केली. तर भाजपात आलेल्या काही नाईक समर्थक नगरसेवक व नेत्यांनीही बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे म्हात्रेंना या निवडणूकीत फटका बसणार, अशी दबक्‍या आवाजात चर्चा होती. 

मात्र, म्हात्रे यांनी त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरूच ठेवल्यामुळे अखेर मंदा म्हात्रे यांना एकूण 87 हजार 858 मते मिळाली. त्याउलट राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक गावडे यांना 44 हजार 261, मनसेचे गजानन काळे यांना मतदारांनी पुन्हा नाकारल्याने त्यांच्या पदरात 27 हजार 618 मते मिळाली. 
याउलट ऐरोलीत भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांच्या बलाढ्य आव्हानासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गणेश शिंदे आणि मनसेचे उमेदवार निलेश बाणखेले यांचे दुबळे आव्हान होते. नाईक यांच्या प्रतिष्टीत चेहऱ्यापूढे या दोन्ही उमेदवारांचा निभाव लागला नाही. या निवडणूकीत नाईकांना एकुण एक लाख 14 हजार 645 मते मिळाली. राष्ट्रवादीचे गणेश शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकावर 36 हजार 154 मते आणि मनसेचे उमेदवार निलेश बाणखेले यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना 22 हजार 818 मते मिळाली. 

या निवडणुकीत वंचितचा प्रभाव निष्प्रभ ठरला. वंचितचे उमेदवार डॉ. प्रकाश ढोकणे यांना 13 हजार 424 इतकी मते मिळाली.  सकाळी नेरूळच्या आगरी-कोळी भवनात बेलापूर विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली. बेलापूरात एकूण 28 तर ऐरोलीत 32 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. मतमोजणी दरम्यान तुर्भे मतदान केंद्रावरील इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे या मशिनची मोजणी शेवटी करण्यात आली. तर ऐरोलीतील सात मतदान केंद्रांवरील मतदान यंत्र बंद पडल्यामुळे, दुरुस्तीनंतर त्यांची मतमोजणी करण्यात आली. 

बेलापूर
1. मंदा म्हात्रे (भाजप) - 87 हजार 858
2. अशोक गावडे (राष्ट्रवादी) - 44 हजार 261
3. गजानन काळे (मनसे) - 27 हजार 618. 

ऐरोली
1. गणेश नाईक (भाजप) - 1 लाख 14 हजार 645
2. गणेश शिंदे (राष्ट्रवादी) - 36 हजार 154
3. निलेश बाणखेले - 22 हजार 818
4. डॉ.प्रकाश ढोकणे (वंचित) - 13 हजार 424

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com