गणेश नाईक हे कमर्शियल राजकारणी : मंदा म्हात्रे

गणेश नाईक हे कमर्शियल राजकारणी : मंदा म्हात्रे

पुणे : माजी मंत्री गणेश नाईक हे कमर्शियल राजकारणी आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे त्यांचे समीकरण आहे. त्यांचा आता प्रभावही नाही. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, याचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी भूमिका नाईक यांच्या विरोधक आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली आहे.

भाजपचे जहाज आता फुल्ल झाले आहे. त्यामुळे नाईक यांना जागा मिळणार नसल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. नाईक यांना नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या आडून भाजपमध्ये यायचे असल्याचे चर्चा आहे. त्यावर म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

हे नगरसेवक नाईकांच्या तालावर नाचणारे आहे. नाईक बोलले की आज दिवस आहे, ते दिवसच बोलतील. त्यामुळे नाईकांच्या सांगण्यानुसारच ते भाजपमध्ये येणार असल्याचे बोलत असतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. पक्षात कोणीही आले तरी बेलापूरची आमदार मीच असेल, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला. नाईक यांच्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष सोडून गेले होते. त्यात मंदा म्हात्रे यांचाही समावेश होता. 

लोकसभा निवडणुकीत नाईकांच्या मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्यम मिळाले होते. याची आठवण त्यांनी यानिमित्त करून दिली. नाईक हे राष्ट्रवादीच्या 57 नगरसेवकांसह राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com