कोरोनाशी लढण्यासाठी या सरपंचाने सोडलयं घरदार!

दत्ता वांजळे हे नेहमीच वेगळे प्रयोग राबवत असतात.
Manchar Sarpanch Afraid of Going Home Styaing in office
Manchar Sarpanch Afraid of Going Home Styaing in office

मंचर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनजागृती करण्याचे काम प्रभावीपणे होण्यासाठी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी घरदार सोडले आहे. गुढीपाडव्यापासून त्यांचा मुक्काम थेट मंचर ग्रामपंचायत कार्यालयातच आहे. त्यांच्या मुक्कामाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

सरपंच गांजाळे हे विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. मंचरमध्ये फ्लेक्स बंदी व अतिक्रमणाच्या विरोधात त्यांनी केलेली धडक कारवाई. तसेच काही खासगी डॉक्टरांनी रुग्णांची आर्थिक लुट करू नये. या मागणीसाठी केलेले उपोषण सर्वश्रुत आहे. नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झाल्या शिवाय पायात चप्पल घालणार नाही. अशी त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. ते गेली दोन वर्ष अनवाणी फिरतात.  

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून मंचरकरांचा बचाव व्हावा म्हणून गांजाळे यांनी हातात स्प्रे धरून संपूर्ण गावात प्रतिबंधक औषधांची फवारणी ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचाऱ्या समवेत केली. अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकाने बंद राहतील यासाठी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत फिरून नागरिकांना आवाहन करून काळजी घेण्याची विनती केली. 

या संदर्भात गांजाळे म्हणाले,"आता घरात जाण्याची भीती वाटते, दररोज असंख्य लोकांमध्ये वावरावं लागत, बोलावं लागत, फिरावं लागत, रात्री अपरात्री फोन आल्यानंतर घराबाहेर पडावे लागते, घरात मुल म्हणतात "सगळे घरी राहतात, मग तुम्हीच बाहेर का? तुम्ही बाहेर जाऊ नका, बाहेर कोरोना विषाणू प्रादुर्भाव आहे. घरी थांबा," हे एकूण मी खूप वेळ निरुत्तर होतो. 

बाहेर लोक विनाकारण वावरतात. बंद झालाय का नाही हे पाहण्यासाठी येतात, काही जण मेडिकलचं कारण सांगून बतावणी करतात, खरच मला घरी जायची भीती वाटते. गावची जबादारी असल्यामुळे कुटुंबापासून वीस दिवस वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माझं घर व गावही ही वाचवायचं आहे. मी मंचर ग्रामपंचायत कार्यलयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये एकटा मुक्कामी राहत आहे, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com