Manase will honor public representatives for bad performance | Sarkarnama

मनसे करणार  लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणाबद्दल सत्कार !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 एप्रिल 2017

महिंद्रा, फोक्‍सवॅगन, फोर्ड, मारुती सुझूकी, हिरो होंडा, नेस्ले,
किया यासह आठ नामांकित कंपन्या इतर राज्यात गेल्या. त्याला
लोकप्रतिनिधींचा कुमकुवतपणा व नसलेली इच्छाशक्ती कारणीभूत ठरली. हे उद्योग शहारातच रहावेत  यासाठी कुठलेच प्रयत्न खासदार,आमदारांनी केले नाही अशी  मनसेने टिका केली आहे .

औरंगाबाद: शिवसेना-भाजप लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे शहराच्याऔद्योगिक विकासाला खिळ बसल्याचा आरोप करत या कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्रनवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या (ता.1) महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानेशिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,आमदार संजय सिरसाट, अतुल सावे यांना  क्रांतीचौक येथे जाहीर सत्कारासाठी 
निमंत्रित केले आहे .

या सत्काराचे निमंत्रण मनसेने संबंधित लोकप्रतिनिधींना ई - मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. मनसेच्या या गांधिगिरीची
शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

लोकप्रिय, प्रतिष्ठीत व कर्तव्यदक्ष अशी उपरोधिक उपाधी देत औरंगाबाद मनसेच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार ठेवण्यात आला आहे. पोत्यात पायघालून धावण्याची शर्यत, खड्यावरुन लांब उडी मारण्याची स्पर्धा असो कीलोकप्रतिनिधींच्या घरासमोर जाऊन शिट्टी फुकण्याचे आंदोलन मनसे अशा अनोख्या आंदोलनामुळे लोकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी झाली आहे.

तरी देखील या पक्षाचा आलेख उतरताच राहिला.आता  पुन्हा आगळावेगळा असा उपक्रम मनसेने हाती घेतला आहे. दोन वर्षात औरंगाबाद उद्योग क्षेत्राचे लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप मनसेने केला
आहे.

महिंद्रा, फोक्‍सवॅगन, फोर्ड, मारुती सुझूकी, हिरो होंडा, नेस्ले,
किया यासह आठ नामांकित कंपन्या इतर राज्यात गेल्या. त्याला
लोकप्रतिनिधींचा कुमकुवतपणा व नसलेली इच्छाशक्ती कारणीभूत ठरली. हे उद्योग शहारातच रहावेत  यासाठी कुठलेच प्रयत्न खासदार,आमदारांनी केले नाही अशी टिका करत ही आनंदाची बाब असून त्याबद्दल मनसे या लोकप्रतिनिधींचा
जाहीर नागरी सत्कार करणार असल्याचे मनसेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख