मनसेने दिली गुलाबाची फुले आणि महापौर पंचम कलानी मराठीत बोलल्या 

Ulhasnagar-Mayor
Ulhasnagar-Mayor

उल्हासनगर : महापालिकेच्या  मागच्या महासभेत मुझे "मराठी नही आती,हिंदीमे मे बोलो" ,असे वक्तव्य महापौर पंचम कलानी यांनी नगरसेवकांना उद्देशून केले होते . 

त्यानंतर उल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौरांना मराठीचे पाठय पुस्तक   व पाटी-खडू भेट देण्यासाठी तिनदा पालिका गाठली होती.पण त्या बाहेर असल्याने पालिकेत आल्या नव्हत्या.मात्र आजच्या महासभे प्रसंगी महापौर पंचम कलानी पालिकेत आल्यावर त्यांना मनसेच्या नेत्यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर थांबवून मनसेने गुलाबाचे फुल दिले . मनसेच्या नेत्यांनी महापौरांना  मराठीत बोलण्याचे आवाहन केले . 
त्यानंतर  महापौर पंचम कलानी मराठीत बोलल्या.त्यांच्यासोबत उपमहापौर जीवन इदनानी,नगरसेवक डॉ.प्रकाश नाथानी,मनोज लासी,प्रदिप रामचंदानी हे सिंधी भाषिक  देखील मराठीत बोलून सभागृहात गेले.

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम,शहराध्यक्ष बंडू देशमुख,संजय घुगे आदींनी मराठीसाठी हे अनोखे आंदोलन केले.
गुरुवार सायंकाळ ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आलेल्या 30 टक्के पाणी कपातीचे पडसाद  मागच्या महासभेत उमटले होते.

भाजपाचे नगरसेवक विजय पाटील हे पाण्यावरून बोलत असताना मुझे "मराठी नही आती,हिंदीमे बोलो"असे वक्तव्य महापौर पंचम कलानी यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता.

तेंव्हा महापौरांना उजळणीचे पुस्तक तसेच पाटी-खडू देऊन मराठी शिकण्याची लिहण्याची सवय करावी अशा मागणीसाठी मनसे सतत पालिकेत येत होती.आज मात्र गुलाबाचे फुल देऊन महासभेत मराठीत बोला असे आवाहन मनसेने केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com