manase is more attacking than congress | Sarkarnama

पुण्यात बंदमध्ये काॅंग्रेसपेक्षा मनसे अधिक आक्रमक

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे : इंधन दरवाढीच्या विरोधात काॅंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदमध्ये पुण्यात मनसे सर्वाधिक आक्रमक राहिली. कुमठेकर रस्त्यावर पीएमटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. कोंढव्यामध्ये दुकाने बंद करण्यात आली. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद सक्तीने बंद करण्यात आले होते.

काॅंग्रेसच्या नेत्यांनी रॅली काढण्याचे काम केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारीही बंदमध्ये उतरले होते. विशेष म्हणजे दोन्ही काॅंग्रेसचे नेते बंदमुळे एकत्र आले होते.  

बाजीराव रस्त्यावरील दुकाने काही काळ बंद ठेवण्यात आली. काॅंग्रेसचे नेते उल्हास पवार, मोहन जोशी यांनी घोडागाडीतून फेरी काढली. कुमठेकर रस्त्यावर पीएमपी बसवर दगडफेक केल्याबद्दल मनसेच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लुल्लानगर चौकात सात ते आठ बस फोडण्यात आला. हिंसाचाराला मनसेचा पाठिंबा नसल्याचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी स्पष्ट केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक राहिले.

अपवाद वगळता पुण्यातील बंद आतापर्यंत शांततेत पार पडला. मार्केटयार्ड, लक्ष्मी रस्त्यावरील काही दुकाने बंद राहिली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख