man ki bat narendra modi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही, पंतप्रधान मोदींनी पाकला ठणकावले 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 सप्टेंबर 2018

पुणे : पाकिस्तानी सैन्यावर आपण स्वतःहून कधीही हल्ला केला नाही. कारण आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र असे असले तरी देशाच्या सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले आहे. 

पुणे : पाकिस्तानी सैन्यावर आपण स्वतःहून कधीही हल्ला केला नाही. कारण आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र असे असले तरी देशाच्या सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले आहे. 

"मन की बात' या आपल्या रेडिओवरील कार्यक्रमात मोदी बोलत होते. मन की बातचा आजचा 48 एपिसोड आहे. भारताच्या कणखर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला आम सभेत काल जोरदार लक्ष्य केले असताना आज मोदी यांनी पाकला इशारा दिला आहे. मोदी म्हणाले, "" गेल्या काही दिवसात सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना आणि पाकिस्तानी रेंजर्सशी लढताना भारताचे अनेक जवान हुतात्मा झाले आहेत. आम्ही शांततेचा पुरस्कार करणारे असलो तरी आपचे जवान जशास तसे उत्तर देण्यास सज्ज आहे.'' 

"मन की बात'ला सुरवात करताना मोदी म्हणाले, की नवरात्री, दुर्गापुजा आणि विजयादशमीच्या मी संपूर्ण भारतीयांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. ऑक्‍टोबर महिन्यात सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण यांच्यासह विजयाराजे शिंदे यांची जयंती आहे. या तिन्ही नेत्यांनी देशासाठी केलेले कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत जाईल.

तसेच केंद्राने 26 राज्यात मानवअधिकार आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचे महत्त्व लक्षात घेऊन ते आचरणात आणण्याची गरज आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊनच 12 ऑक्‍टोबर 1993 मध्ये मानवअधिकाराची स्थापना करण्यात आली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले 

जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान भारताच्या पुढाकाराने घेण्यात येणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख