mamta banaraji attack modi govn | Sarkarnama

"माकप'मध्ये काम केलेले गुंड आता भाजपचे सदस्य, ममता बॅनर्जी यांचा घणाघात 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा भाजपवर घणाघाती हल्ला चढविला. भाजप राज्यामध्ये खुनाचे राजकारण करीत असून, विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करण्यासाठी तपास संस्थांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

राज्यातील ताज्या पंचायत निवडणुकीचा हवाला देताना ममता म्हणाल्या, की कधी काळी "माकप'मध्ये काम केलेले गुंड आता भाजपचे सदस्य म्हणून काम करताना दिसतात. माओवाद्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जंगलमहालमध्ये एवढा आटापिटा केल्यानंतरदेखील भाजपला काही जागांवरच समाधान मानावे लागले, असेही त्यांनी नमूद केले. 

तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. "राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी'बाबत (एनआरसी) बोलताना बॅनर्जी यांनी सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले.

""आपले सरकार कोणत्याही परिस्थितीत "एनआरसी' होऊ देणार नाही. भाजप आता आम्हाला आव्हान देतो आहे, भविष्यातदेखील त्यांची हीच वर्तणूक कायम राहिल्यास आमचा पक्ष त्यांना सडेतोड उत्तर देईल. आमच्या राज्यातील एखादा नागरिक चुकीच्या पद्धतीने बाहेरचा दाखविण्यात येणार असेल, तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. आम्ही बंगाल टायगर्स आहोत,'' असेही त्यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख