mamata banjarji cm west bangal | Sarkarnama

आजचा वाढदिवस : ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी 1970 मध्ये युवक कॉंग्रेसच्या छात्र परिषदेमधून राजकारणात उडी घेतली. लढवय्या स्वभाव व आक्रमक नेत्या अशी प्रतिमा तयार झालेल्या ममता बॅनर्जी यांनी 29 व्या वर्षी 1984 मध्ये ज्येष्ठ व लोकप्रिय नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव केला. त्यानंतर मात्र त्यांना 1989 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. राजीव गांधीच्या काळात त्या कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस होत्या. 1991 पासून त्या दक्षिण कोलकाता मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आल्या आहेत. माजी पंतप्रधान पी. व्ही.

प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी 1970 मध्ये युवक कॉंग्रेसच्या छात्र परिषदेमधून राजकारणात उडी घेतली. लढवय्या स्वभाव व आक्रमक नेत्या अशी प्रतिमा तयार झालेल्या ममता बॅनर्जी यांनी 29 व्या वर्षी 1984 मध्ये ज्येष्ठ व लोकप्रिय नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव केला. त्यानंतर मात्र त्यांना 1989 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. राजीव गांधीच्या काळात त्या कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस होत्या. 1991 पासून त्या दक्षिण कोलकाता मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आल्या आहेत. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्या मंत्री होत्या पण मतभेदामुळे त्यांनी 1993 ला मंत्रिपद सोडले व कॉंग्रेसही सोडली. पुढे चार वर्षांनी 1998 मध्ये त्यांनी स्वतः तृणमूल कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. भाजपप्रणीत एनडीए सरकारला त्यांनी पाठिंबा दिला. 2004 मध्ये त्या काही काळ रेल्वेमंत्री होत्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकांत त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. तृणमूल कॉंग्रेसच्या त्या एकमेव खासदार होत्या. त्याचबरोबर महापालिका निवडणुकांतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या नेतृत्वाला त्यानंतर गती मिळाली ती "टाटा मोटर्सच्या नॅनो कार' प्रकल्पाला जोरदार विरोधी भूमिका घेतल्यामुळे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या केलेल्या लढ्यात त्यांनी 25 दिवस उपोषण केले होते. शेवटी टाटांनी "नॅनो कार' चा प्रकल्प रद्द केला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प. बंगालमधल्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली. विकासाचा अजेंडा राबवून त्यांनी भाजप, कॉंग्रेस, कम्युनिस्ट यांच्या पुढे पर्याय उभा केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख