संविधान वाचविण्यासाठी कॉंग्रेसला विजयी करा - मल्लिकार्जुन खरगे

दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक फार महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन झाले तर केंद्रात पण सत्ता परिवर्तन होईल. ही तत्त्वांची लढाई आहे. संविधानाच्या रक्षणासाठी कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशप्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.
संविधान वाचविण्यासाठी कॉंग्रेसला विजयी करा - मल्लिकार्जुन खरगे

नागपूर - दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक फार महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन झाले तर केंद्रात पण सत्ता परिवर्तन होईल. ही तत्त्वांची लढाई आहे. संविधानाच्या रक्षणासाठी कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशप्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

जाटतरोडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रणजित देशमुख, अनीस अहमद, आशीष दुवा, संत भजनाराम, किशोर गजभिये, अलका कांबळे, प्रफुल्ल गुडधे, दिलीप पनकुले, अतुल लोंढे आदी उपस्थित होते. नागपूर दोन विचारधारेने जोडलेले शहर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी व इतर समाजसुधारकांची विचारधारा एकीकडे व आरएसएसची विचारधारा दुसरीकडे आहे. आपली लढाई ही मुख्यमंत्र्यांशी नाही, त्यांच्या विचारधारेशी आहे. लहान पक्षांना मतदान करून मत विभागणी करू नका. भाजपने देशाचे वाटोळे केले. मार्केटिंग करून भाजप लोकांची दिशाभूल करीत आहे. दलित व मागासवर्गीयांनी कॉंग्रेसला मतदान करावे. आरक्षण मिळू नये म्हणून भाजप प्रयत्न करीत आहे. सरकारी संस्था खासगीकरणाचे भाजपचे काम सुरू आहे. संविधान वाचविण्यासाठी जागे व्हा, एकत्र या, असे आवाहन मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

डॉ. आशीष देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करू शकतात म्हणून त्यांना उमेदवारी दिली आहे. मिहान कॉंग्रेसने आणला. परंतु, तिथे उद्योगधंदे नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. दिशाभूल करणाऱ्या भाजपचा पराभव करा, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. डॉ. आशीष देशमुख यांनी प्रास्ताविकात भाजपचा खरपूस समाचार घेतला. संधी मिळाल्यास या क्षेत्राचा कायापालट करीन, असेही देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com