malika arjun kharhe attack modi govn | Sarkarnama

देशाची घटना बदलण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकवा : खर्गे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पुणे : देशाची घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या आणि लोकशाहीला धोका ठरणाऱ्यांना देशातील जनतेने धडा शिवण्याची गरज आहे, असे मत कॉंग्रेसचे लोकसभेततील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज येथे व्यक्त केले. 

पुणे : देशाची घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या आणि लोकशाहीला धोका ठरणाऱ्यांना देशातील जनतेने धडा शिवण्याची गरज आहे, असे मत कॉंग्रेसचे लोकसभेततील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज येथे व्यक्त केले. 

प्रदेश कॉंग्रेसने आयोजित केलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात झाला. यावेळी ते बोलत होते. खर्गे म्हणाले, "" देशातील लोकांशी खोटे बोलून भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आले आहे. रोजगार निर्मितीत या सरकारला मोठे अपयश आले आहे. इंधन दरवाढ गगणाला भिडली असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दुसरीकडे मोठ्या उद्योगांना कर्ज देण्यात येत असून यातील अनेकजण कर्ज बुडवून देशातून पळून जात आहेत. या साऱ्या परिस्थितीतीला पंतप्रधान मोदी यांचे सरकार कारणीभूत आहे.''

रोजगार आणि अर्थिक पातळीवर ही परिस्थिती असताना देशातील सामाजित व धार्मिक पातळीवर असुरक्षिततेची भावना वाढत आहे. या सरकारच्याविरोधात लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी यापुढील काळात कॉंग्रेसच्यावतीने देशभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असे सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रा फैजपूर येथून सुरू होत आहे. जनसंघर्ष यात्रेला राहूल गांधी उपस्थित राहणार असल्याचे खर्गे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख