malik and udyanraje bhosale | Sarkarnama

उदयनराजेंनी राऊतांच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे, धमकी देऊ नये - नवाब मलिक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

औरंगाबाद : उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टिका केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना काही प्रश्‍न केले आहेत. उदयनराजे यांनी त्याची उत्तर द्यावीत, पाय तोडण्याची धमकी नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी उदयनराजे यांच्यावर टिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही वंशज आहात याचे पुरावे द्या, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती. यावरून राऊत यांना उदयनराजे यांच्यांकडून धमकी देण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर नवाब मलिक यांनी राऊत यांचे समर्थन करतांना उदयनराजे यांनी राऊतांच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे, धमकी नाही असे आवाहन केले आहे. 

औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना नवाब मलिक म्हणाले, देशात अनेक राजघराणे होऊन गेलेत, पण प्रत्येक वेळी त्या घराण्याचा वारस हा रक्ताच्या नात्याचाच असेल असे नाही. अशी बरीच उदारणे पहायला मिळतात, त्यावरूनच संजय राऊत यांनी उदयनराजे यांना काही प्रश्‍न विचारले होते. पण त्याची उत्तर न देता धमकी देणे योग्य नाही असेही मलिक यांनी यावेळी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख