malik and udaynraje bhosale | Sarkarnama

उदयनराजेंनी वंशजाच्या पुराव्याबद्दल उत्तर द्यावे - नवाब मलिक

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 16 जानेवारी 2020

औरंगाबाद : देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गादीचे वारसदार आहेत. तसे रक्‍ताचे देखील आहेत. मात्र, शिवसेनेचे नेते संजय राऊत जर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशज असल्याच्या पुराव्याबद्दल प्रश्‍न उपस्थित करत असतील तर त्याचे उत्तर उदयनराजेंनी द्यावे, असे मत व्यक्‍त करीत राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. 

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या श्री. मलिक यांनी सुभेदारी शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता.16) पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना " आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकासह उदयनराजे व श्री. राऊत यांच्यात सुरू असलेल्या शाब्दीक युद्धाबद्दल छेडले असता ते म्हणाले, गादीचे वारस आणि रक्‍ताचे नाते वेगळे असते. कोण दत्तक आणि कोण रक्‍ताचे आहेत, हे मला माहिती नाही. पण देशात बरेच जण गादीचे वारसदार आहेत. तसी प्रथाही आहे. दरम्यान, श्री. राऊत हे पुरावे मागत आहेत. त्यांच्या प्रश्‍नांचे उदयनराजेंनी उत्तर द्यावे, असा टोला श्री. मलिक यांनी लगावला. 

उदयनराजेंना वाटायचे त्यांच्यामुळे सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी निवडून येते. मात्र, तसे नाही. हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. भाजपवाले त्यांना मंत्री करणार होते. परंतु ते निवडूनच आले नाहीत. म्हणून मंत्री होत नाहीत. आता पुस्तकावरून वाद सुरु झाल्यानंतर विरोध करण्याऐवजी ते पाठराखण करीत आहेत. त्यांना काहीतरी मिळेल, असे वाटत असेल त्यामुळेच ते भाजपची देखील पाठराखण करीत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख