माळेगाव कारखान्याची सभा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे

माळेगाव कारखान्याची सभा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे

माळेगाव : बारामती तालुक्यात राजकियदृष्या महत्व असलेल्या माळेगाव कारखान्याच्या वादग्रस्त कारभाराच्या पार्श्वभूमिवर कोणाचे पारडे जड आहे, हे दाखविण्यासाठी उद्या सभासदांची होत असलेली वार्षिक सभा सत्तासंघर्षाची पहावयास मिळेल, असा अंदाज अनेकांनी वर्तविला आहे. ही बाब विचारात घेवून उपविभागिय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी वरील सभेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे सांगण्यात आले. 

माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने येथील शिवतीर्थ सभागृहात उद्या (ता.29 सप्टेंबर) रोजी दुपारी आयोजित केलेल्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तयारी पूर्ण केली आहे. माळेगावचा वादग्रस्त कारभार सभासदांसाठी अलिकडे चिंतेचा विषय बनला आहे. अध्यक्ष रंजन तावरे आदी सत्ताधारी मंडळी सध्या मनमानी निर्णय घेत असल्याची टिका पुर्णतः कार्यक्षेत्रात वारंवार होत आहे. त्याचे पडसाद उद्याच्या सभेवर पडणार असल्याचा अंदाज बांधत सत्ताधारी व विरोधी संचालकांसह अनेक सभासदांनी सभेत गाजणाऱ्या मुद्यांचा सखोल अभ्यास केला आहे.

त्यामध्ये तांत्रिक मुद्यांच्या आधारे चार संचालकांना घरी घालविणे, अंतिम भावात प्रतिटन तीनशे रूपयांची लावलेली कात्री, अधुनिकीकरणाच्या नावाखाली विस्तारिकरणाची सुमारे 60 कोटी रूपये किंमतीची यंत्रसामुग्रीची घाईगडबडीत खरेदी करणे, संचालक व सभासदांपासून आधुनिकीकरणाचा प्रकल्प अहवाल दाबून ठेवणे, कारखाना मिलसह 
बायलिंग हाऊस व डिस्टलरी प्रकल्पांना कार्यक्षमतेचे पुरस्कार मिळालेले असताना आधुनिकीकरणाचा प्रकल्प रेटण्यासाठी केलेले खोटे ठराव, कार्यक्षेत्रात उसाचा तुटवडा असतानाही कारखान्याचा वाढता विस्तार व ऊस टंचाई विचारात घेता सुमारे 12 लाख टन उसाची उपलब्धता कशी होणार, गाळप क्षमता प्रतिदिनी किती वाढणार, आधुनिकीकरण वेळेत न झाल्यास आमच्या उसाला वाली कोण, साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न, डिस्टलरीच्या प्रदुषणामुळे वाढत्या शेतकऱ्यांच्या तक्रारी, गतवर्षी उशिरा गाळपामुळे झालेली उसाची चिपाडे आणि सहकारी तत्वांची झालेली पायमल्ली आदी सभासदांच्या समस्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी ठरणार असल्याची चिन्हे आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com