`माळेगाव`चे चित्र परत बदलले; राष्ट्रवादी आता दोन जागांवर पुढे

....
ranjan taware-balasaeb taware
ranjan taware-balasaeb taware

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माळेगाव गटातून आता राष्ट्रवादीच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे दोन तर; सहकार बचावचा एक उमेदवार आघाडीवर आहे. मतांच्या बेरजेवरून कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकाऱ्यांत बाचाबाची सुरू झाल्याने मतमोजणी खोळंबली आहे. माळेगाव गटाची मोजणी सध्या सुरू आहे. 

पाचव्या फेरी अखेरचे चित्र (माळेगाव गट) 

संग्राम काटे सहकार बचाव 2480
संजय काटे राष्ट्रवादी 2526
बाळासाहेब तावरे राष्ट्रवादी 2727
रंजनकुमार तावरे सहकार बचाव 2801
देवकाते शशिकांत अपक्ष 93
पोपट बुरुंगले राष्ट्रवादी 2424
स्वरूप वाघमोडे सहकार बचाव 2358

चौथी फेरी

संग्राम काटे सहकार बचाव 1462
संग्राम काटे NCP 1548
बाळासाहेब तावरे NCP1661
रंजनकुमार तावरे सहकार बचाव 1679 
देवकाते शशिकांत अपक्ष 60
पोपट बुरुंगले NCP 1483
स्वरूप वाघमोडे सहकार बचाव 1384

माळेगाव कारखान्याच्या अटीतटीच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी सहकार बचाव पॅनेलच्या चतुर्भुज मुळीक यांचा 57 मतांनी दणदणीत पराभव केला. अन्य 20 जागांसाठी मात्र साडेतीन वाजल्या तरी मतमोजणीला सुरवात झाली नव्हती. 


माळेगाव कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. वीस जागांसाठी सर्व सभासद मतदान करणार असल्याने त्या जागांबाबत दोन्ही पक्ष खात्री देऊ शकत नव्हते. मात्र ब वर्ग मतदारसंघात मात्र सोसायट्या व सहकारी संस्था मतदान करतात. यावर राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व आहे. या गटात 100 पैकी 98 मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनलचे स्वप्नील जगताप यांना 77 मते मिळाली तर सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या चतुर्भुज मुळीक यांना अवघ्या वीस मतांवर समाधान मनावर लागले. तर एक मत बाद झाले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या पहिल्या अपेक्षित यशाने राष्ट्रवादीच्या गोटात समाधानाचे वातावरण होते. 
सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजनकुमार तावरे यांनी, माझाच पॅनल बहुमत मिळवेल असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान साडेबारा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतपत्रिका वेगळ्या करण्यात तीन तास गेले. पावणेचार वाजता मतपत्रिका मोजण्यास सुरवात झाली आहे. संथ गतीने प्रक्रिया सुरू आहे. मतदान कक्षबाहेर उपस्थित असलेले दोन्ही गटाचे हजारभर कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. सर्व निकाल येण्यास मध्यरात्र होईल असे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com