मालेगावचा महापौर कोण ?  शिवसेनाच किंगमेकर  - malegaon mayur election | Politics Marathi News - Sarkarnama

  मालेगावचा महापौर कोण ?  शिवसेनाच किंगमेकर 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 7 जून 2017

मालेगाव : महापौर पदासाठी कॉंग्रेसचे रशीद शेख व मालेगाव महागटबंधन आघाडीचे नबी अहमद अहेमदुल्ला यांच्यात सरळ लढतीची शक्‍यता आहे. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक 14 जूनला होणार आहे. यामध्ये एमआयएम तटस्थ राहणार असल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर महापौरपद ठरेल. 

मालेगाव : महापौर पदासाठी कॉंग्रेसचे रशीद शेख व मालेगाव महागटबंधन आघाडीचे नबी अहमद अहेमदुल्ला यांच्यात सरळ लढतीची शक्‍यता आहे. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक 14 जूनला होणार आहे. यामध्ये एमआयएम तटस्थ राहणार असल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर महापौरपद ठरेल. 

मालेगाव महापालिका निवडणूकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या शेवटपर्यंत एकमत न झाल्याने हो दोनही पक्ष आता एकमेकांसमोर उमेदवार देणार आहेत. यामध्ये एमआयएम तटस्थ राहील हे स्पष्ट झाल्याने तेरा सदस्य असलेल्या शिवसेनेच्या भूमिकेला महत्व आहे. आज रात्री उशीरा याबाबत शिवसनेचे नगरसेवक भूमिका ठरविण्याची शक्‍यता आहे. मात्र राजकारणातील अस्थिरता आणखी काही दिवस टिकून राहील. त्यामुळे राजकारण कोणती कुस बदलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

कॉंग्रेसने माजी आमदार रशीद शेख यांची उमेदवारी निवडणुकीपुर्वीच जाहीर केली होती. श्री. शेख व त्यांच्या पत्नी माजी महापौर ताहेरा शेख या दाम्पत्याने कालच अर्ज नेले.आज आघाडीचे नबी अहमद अहेमदुल्ला यांनी उमेदवारी अर्ज नेला. 

महापौरपदासाठी 9 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व जनता दल आघाडीचा महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित नव्हता. मात्र सुरुवातीपासूनच नबी अहमद यांच्या नावाची चर्चा सुरु होती. आज त्यांनी अर्ज नेल्याने आघाडीतर्फे त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे शेख व अहमद यांच्यात लढत रंगणार आहे. त्रिशंकू स्थितीत महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तेचे समीकरण जुळवित कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. महापौर पदासाठी आज अखेरपर्यंत शेख दाम्पत्यासह तिघांनी अर्ज नेले आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख