माळेगाव कारखान्याच्या संचालकाची बैठक पोलिस बंदोबस्तात यशस्वी ...

उद्या अध्यक्षपदाची निवडणूक...!माळेगाव कारखाना निवडणूकीत निवडून आलेल्या नवनर्वाचित संचालक मंडळामधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उद्या रविवार (ता. 8 ) रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे यांच्या अधिपत्याखाली वरील निवडणूक पार पडेल. अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्यात निळकंठेश्वर पॅनेल बहुमताने निवडून आले आहे. त्यामुळे पवार कोणाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची माळ टाकतात, याबाबत सर्वत्र उत्सूकता आहे. अध्यक्षपदासाठी बाळासाहेब तावरे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, केशवराव जगताप, अनिल तावरे इच्छुक आहेत, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी नामदेव देवकाते यांचेही नाव चर्चेत आहे.
माळेगाव कारखान्याच्या संचालकाची बैठक पोलिस बंदोबस्तात यशस्वी ...

माळेगाव : कामगारांच्या हुद्देवारीसह मागील विषयांचे प्रोसडींग वाचून कायम करण्याच्या वादग्रस्त ठरावाला बहुमताने मंजुरी घेत माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, चंद्रराव तावरे यांनी आज मावळत्या संचालक मंडळाची बैठक यशस्वी केली. मंबई उच्च न्यायालयाने शुक्रवार (ता.6 ) रोजी अध्यक्ष तावरे व त्यांच्या संचालकांना पुढील एक महिना कारखान्याचा कारभार करण्यास मुभा दिल्याने वरील बैठक किरकोळ प्रसंग वगळता शांततेत पार पडली. 

विशेषतः राष्ट्रवादीच्या विचाराचे बाळासाहेब तावरे यांच्यासह संचालकांनी मागिल प्रोसडींग वाचून कायम करण्याच्या विषयाला लेखी विरोध नोंदविला, तर उर्वरित साखर व अल्कोहल विक्री आदी विषयांना सहमती दर्शविली. त्यामुळे मंजूर ठरावाच्या बाजूने 11, तर ठरावाच्या विरुद्ध 9 संचालकांनी निर्णायक भूमिका घेतली. प्रोसिडिंग कायम करण्याच्या ठरावाला विरोध केलेल्या संचालकांमध्ये बाळासाहेब तावरे, संगीता कोकरे, तानाजी कोकरे, रामचंद्र देवकाते, सुरेश खराटे,अविनाश देवकाते, विलास देवकाते, एस एन जगताप, तानाजी पोंद्‌कुले इत्यादींचा समावेश होता. 

मावळते संचालक बाबा जगताप (पणदरे) हे वरील बैठकीत गैरहजर राहिले. त्याच वेळी सभागृहाच्या बाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 25 फेब्रूवारी रोजी पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. सत्ताधारी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. परंतु त्यांच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ एक महिना बाकी राहिला होता. या प्राप्त स्थितीत बहुमताने निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित संचालकांनी कारखाना कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच अध्यक्ष तावरे यांनी मागील तीस मासिक सभांचे प्रोसडिंग कायम करण्यासाठी जुन्या संचालक मंडळाच्या बैठकीचा सात तारखेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यावर जोरदार अक्षेप घेत नवनिर्वाचित संचालकांनी बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष तावरेंच्या विरुद्ध आवाज उठविला होता. कार्यकारी संचालक विजय वाबळे यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार तुमचे संपलेले आहेत, असे म्हणून कामकाजाला आटकाव आणला होता. हा प्रकार थांबविण्यासाठी कारखाना प्रशासनाने थेट उच्च न्यायलयात धाव घेतली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com