अजितदादांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मतपेट्यांना जागता पहारा

...
अजितदादांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मतपेट्यांना जागता पहारा

माळेगाव :  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 91. 55 टक्के असे विक्रमी मतदान झाले. हे विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे जरी उद्या (सोमवार) मतमोजणीनंतर समजणार असले तरी विषेशत: सत्ताधारी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मतपेटीला  जागता पहारा ठेवला आहे.

एका बाजूला शस्त्रधारी पोलिसांचे संरक्षण आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचं सुरक्षा कवच पाहता ही निवडणूक किती चुरशीची झाली आहे हेच स्पष्ट होते.

बारामती शहरातील जयश्री गार्डन मंगल कार्यालय मध्ये सुरक्षित ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब घोलप या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली वरील सुरक्षेची जबाबदारी आहे. दरम्यान, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष व सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतमोजणी ठिकाणी ठिय्या मांडल्याचे दिसून आले. दुसरीकडे, निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव कुंभार यांनी मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्णत्वाला आल्याचे सांगितले.

सोमवार (ता. 24 ) रोजी सकाळी नऊ वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मतमोजणीसाठी 45 टेबल उभारण्यात आले आहेत. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन व वाहतुकीची कोंडी होणार नाही या प्राप्त तिचा विचार करून मतमोजणी केंद्राच्या समोरील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती वरील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. अधिकारी हिरे पुढे म्हणाले,की  मतपेट्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी शील बंद अवस्थेत ठेवण्यात आलेले आहेत. तसेच मतपेट्या ज्याठिकाणी ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेची नजर असणार आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्णत्वाला येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com