मालेगावात 411 मशिदी, मात्र एकाही मशिदीत राजकीय कार्यक्रम होऊ दिलेला नाही!

मालेगावच्या मशिदींना मोठा इतिहास आहे. आजमितीला शहरात तब्बल चारशे अकरा मशिदी आहेत. या मशिदींत राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जातो फक्त 'नमाज'साठी. कोणताही, कधीही व एकही राजकीय कार्यक्रम या मशिदींत झालेला नाही
Malegaon City of Masjids
Malegaon City of Masjids

मालेगाव : तुम्हाला माहिती नसेल, मालेगाव शहरात तब्बल 411 मशीदी आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधीक मशिदी असलेले हे क्रमांक दोनचे शहर आहे. आश्‍चर्य वाटेल, पहिली मशिद 1797 मध्ये पेशव्यांचे सरदार नारोशंकरांच्या सैनिकांसाठी बांधली आहे. येथील लाल मशीद एव्हढी देखणी आहे की देशभरातून लोक ती पाहण्यासाठी येतात. या मशिदींत राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जातो फक्त 'नमाज'साठी. कोणताही, कधीही व एकही राजकीय कार्यक्रम या मशिदींत झालेला नाही.

भारतात भोपाळ मध्ये तर महाराष्ट्रात औरंगाबाद शहरात सर्वाधीक मशिदी आहेत. राज्यातील मशिदीच्या संख्येत मालेगावचा दुसरा क्रमांक आहे. राज्यातील सर्वाधीक बांगी (नमाजची बांग देणारे) व मौलाना (नमाजचे नेतृत्व करणारे) मालेगाव शहरात आहेत. त्यांचा इतिहास अतिशय रंजक, बंधुभाव व समाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारा आहे. शहरातील मशीद संस्कार केंद्र असतानाच दानशुरतेची प्रचिती देतात. 

येथील पन्नासपेक्षा अधिक मशिदसाठी दानशुरांनी जागा मोफत तर काहींनी विकत घेऊन मशीदसाठी जागा दिली. येथील मुश्‍ताक व शब्बीर अहमद या बंधुंनी वडिलांच्या स्मरणार्थ जागा व उत्कृष्ट वास्तुही बांधून दिली. या दानशुरतेमुळे राज्यातील सर्वाधिक मशीद असलेल्या औरंगाबाद पाठोपाठ शहराचा संख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. दोन ठिकाणी मंदीर- मशीद शेजारी असुन ते धार्मिक एकतेचे प्रतिक आहे. या मशीदी इतिहासाची साक्ष व शहराचे वैभव आहे.

येथील सर्वात पहिली शाही मशिद 1797 मध्ये सरदार नारोशंकर यांच्या सैन्यातील मुस्लीम बांधवांसाठी साकारली. 1799 ला गुरबेद मशीद झाली. 1839 ला प्रसिध्द फत्तेह मैदनात भाऊमियॉं मशिद आकाराला आली. येथील मशिदींची नावेही आगळीवेगळी आहेत. गुळबाजार भागातील 15 हजार नमाजी नमाज पठण करतील अशी जामा मशिद सर्वात मोठी आहे. आमदार मौलाना मुफ्ती हेच या मशिदीचे पेशेइमाम आहेत. बहुमजली असलेल्या येथील खानका बरकतीयासह चार मशिद अखंड दगडातील पिलरवर आहेत. 

मिनारा मशिदीतून संपुर्ण शहराला 1960 पर्यंत पाणीपुरवठा होत होता. येथील नुरानी मशिदसारखी हुबेहुब मशीद दक्षिण आफ्रिकेत झाली. नुरानी व गुरबेद या दोन मशीदीत नमाज पठणाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना मर्कज मशीद संबोधतात. शंभरहून अधिक मशिदीत विहिरी तर प्रत्येक ठिकाणी कुपनलिका. वेगवेगळे मिनार लक्षवेधी. गेल्या दशकात पन्नासहून अधिक नव्या मशीदी साकारल्या. शहरात कोठेही यामुळे रस्त्यावर नमाज पठण होत नाही. शिया, सुन्नी, अहेले हदीस प्रत्येक पंथाच्या वेगवेगळ्या मशिद

लाल मशिदीला वास्तूरचनेचा पुरस्कार

येथील पवारवाडी-इकरा नगरातील मुश्‍ताक व शब्बीर अहमद बंधूंनी बांधलेल्या मश्‍जिदे-अब्दुल-रौफ (लाल मशीद) ला उत्कृष्ट वास्तूरचनेचा पुरस्कार. राज्यभरातील मुस्लीम बांधव येतात मशिद पाहण्यासाठी. देखणी वास्तु, ग्रीन बिल्डींग, स्वच्छता, सुर्यप्रकाश व शांतता यामुळे वातावरण प्रसन्न व भारावून टाकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com