धार्मिक ते पसरवणा-या पोस्ट टाकल्याने मालेगावला दोघांना अटक

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याच्या आरोपावरुन वेगवेगळ्या पाच गुन्ह्यात आजवर अटक झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. तरी देखील अफवांचे पेव सुरुच आहे.
धार्मिक ते पसरवणा-या पोस्ट टाकल्याने मालेगावला दोघांना अटक

मालेगाव : शहरातील जय श्रीराम युवा मंच या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर कोरोना संदर्भात दोन समाजात तेढ निर्माण करणारा, आक्षेपार्ह मजकुर व्हायरल झाला. त्याबद्दल पोलिसांनी व्हाटस्अॅप ग्रुपच्या अॅडमीनसह दोघांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. दोघा संशयितांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गोपाळ सोनवणे (३०, रा. इंदिरानगर, सोयगाव) हा जय श्रीराम युवा मंच या व्हॉट्‌सॲप ग्रुपचा  आहे. या ग्रुपवर मोतीलाल शेवाळे (४२, रा. कलेक्टर पट्टा) यांनी कोरोना विषाणुच्या पाश्‍र्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकला.

 हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर हवालदार मनोज डिंगर यांच्या तक्रारीवरून दोघांविरुध्द कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

यासंदर्भात उपनिरीक्षक एस. एच. देशमुख तपास करीत आहेत. सोशल मिडीयावर अपप्रचार, कोरोनासंदर्भात अफवा व सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर टाकणाऱ्यांविरुध्द पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

यापुर्वी आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल सिध्दार्थ पटाईत तसेच पोहोणे येथे कोरोनाबाधीत व्यक्ती आढळल्याची अफवा पसरविण्याच्या आरोपावरुन अजंगचे उपसरपंच सिध्दार्थ गरुड यांना अटक करण्यात आली होती. 

'टिकटॉक'वर कोरोनासंदर्भात अपप्रचार करणारा व चीड आणणाऱ्या मजकुराची ध्वनी चित्रफीत टाकल्याच्या आरोपावरुन अब्दुल रहिम कुरेशी, सय्यद हुसेन अली, सुफियान शेख मुक्तार व सैय्यद जमील बाबू या चौघांना अटक करण्यात आली होती.

सायबर क्राईम पोलिस सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवून असून अफवा पसरविणारे व आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक रत्नाकर नवले व ग्रामीणचे उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.
..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com