निमित्त"मॉब लिंचींग'चे, हेतू कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात "एमआयएम'च्या प्रवेशाचा

 निमित्त"मॉब लिंचींग'चे, हेतू कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात "एमआयएम'च्या प्रवेशाचा

मालेगाव : मॉब लिंचींगच्या विरोधात मोर्चाद्वारे सरकारविरोधात चार लाख बांधवांचा मोठा मोर्चा मालेगाव शहरात सोमवारी निघाला. त्यात सर्व घटक, राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले. मात्र मोर्चाचे स्वरुप धार्मिक असल्याने त्याचे नेतृत्व गेले तिसरा महाजचे माजी आमदार मौलाना मुफ्ती महंमद इस्माईल यांच्याकडे. स्वतः मुफ्ती यांनी आगामी निवडणुकीत उतरण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे निमित्त मॉब लिंचींग मोर्चाच्या शक्तीप्रदर्शनाचे प्रत्यक्षात "एमआयएम'च्या ताकदीची निवडणूक चाचपणी असे चित्र रंगले. 

देशात अनेक ठिकाणी मॉब लिंचींगच्या नावाखाली मुस्लिम समाजावर हल्ले होत आहेत. त्याच्या निषेधार्थ केंद्र व राज्य शासनाने मुस्लीम समाजाला संरक्षण द्यावे. यासंदर्भात कडक कायदा करुन हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी जमियत उलेमाच्या नेतृत्वाखाली सोमवारी मालेगाव शहरात मुकमोर्चा काढण्यात आला. मोर्चाला शहरातील विविध मुस्लीम संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनता दल, एमआयएम आदी पक्षांनी पाठिंबा दिला होता. मात्र त्याचे नेतृत्व गेले ते जमीयत उलेमाचे शहराध्यक्ष व माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्याकडे. त्यामुळेच मोर्चाविषयी नसली तरी मौलाना मुफ्ती यांच्या विषयी शहरात राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्याला इथली स्थानिक राजकीय परिस्थिती कारणीभूत ठरली आहे. 

मालेगाव शहरातील राजकीय पार्श्‍वभूमी त्याला जबाबदार ठरली आहे. मालेगाव शहर गेल्या काही वर्षात कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनला आहे. येथील आमदार आसीफ शेख कॉंग्रेसचे. महापालिकेत सत्ता कॉंग्रेसची व महापौर कॉंग्रेसचे माजी आमदार रशीद शेख आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती अटळ आहे. कॉंग्रेसचे नेतृत्व शेख कुटुंबीयांकडे आहे, मौलाना मुफ्ती हे त्यांचे परंपरागत राजकीय विरोधक आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले मौलाना मुफ्ती यांचा राजकीय कोंडमारा होत आहे. त्यांनी आपले वेगळे अस्तित्व जपले आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचा प्रचार करण्यासाठी विनंती पत्र घेतले. त्यानंतरच ते प्रचारात उतरले. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मालेगाव शहरातून अवघी पाच हजार मते मिळाली होती. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची तयारी केलेल्या मौलाना मुफ्ती यांना सध्याच्या स्थितीत "एमआयएम' हाच एकमेव पर्याय आहे. शहरात "एमआयएम'चे आठ नगरसेवक आहेत. येथील 80 टक्के मतदार मुस्लीम आहेत. या पार्श्‍वभूमीवर मॉब लिंचींगच्या निमित्तामे काढलेला मोर्चा केंद्रातील भाजप सरकार विरोधात असला तरीही त्याचे लक्ष्य मात्र मालेगावच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसला आव्हान हेच आहे. यादृष्टीने हा मोर्चा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com