malegaon administration gives warning to home quarantine mim mla maolana mufti
malegaon administration gives warning to home quarantine mim mla maolana mufti

होम क्वारंटाईन `एमआयएम'  आमदार मौलानांना प्रशासनाने खडसावले

डॉक्‍टरांवर हल्ला व त्यानंतर होम क्वारंटाईन करण्यात आलेले येथील "एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. होम क्वारंटाईन असतांना त्यांनी कार्यकर्ते, नागरीकांसमवेत कार्यक्रमाच्या तयारीसाठी संवाद साधला. त्यामुळे प्रशासनाने त्यांना चांगलेच खडसावले आहे.

मालेगाव ः डॉक्‍टरांवर हल्ला व त्यानंतर होम क्वारंटाईन करण्यात आलेले येथील "एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. होम क्वारंटाईन असतांना त्यांनी कार्यकर्ते, नागरीकांसमवेत कार्यक्रमाच्या तयारीसाठी संवाद साधला. त्यामुळे प्रशासनाने त्यांना चांगलेच खडसावले आहे.

आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना "होम क्वारंटाईन'राहण्याचा सल्ला माहापालिका प्रशासनाने दिला होता. गेल्या आठवड्यात बुधवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. तसेच ते गेल्या महिन्यात दिल्ली, आग्रा येथून परले होते. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. नुकताच त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. आज आमदार मौलाना यांनी "कोरोना'च्या पार्श्‍वभूीवर मदत कार्यक्रम करण्यासाठी निकटचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना घरी बोलावून चर्चा केली होती. त्याची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या आयोग्य विभागाने त्यांच्या निवासस्थानी पथक पाठवले. त्यांनी त्यांना चांगलेच खडसावले तसेच याबाबत सहकार्य न केल्यास अन्य पर्यायांचा विचार केला जाईल असे स्पष्ट केले.

यासंदर्भात कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार रशीद शेख यांनी आमदार मौलाना यांच्याविषयी प्रशासनाच्या निर्णयावर टिका केली होती. त्यामुळे या विषयाला राजकीय वळण लागले होते. त्यातच नुकतेच तबलीगी पंथाचे दिल्ली येथे पार पडलेला मरकज कार्यक्रम झाला. त्यात मालेगावचे वीस ते बावीस जण सहभागी झाले होते. ते सर्व जण अद्याप प्रशासनाच्या हाती लागलेल नाही. शहरात तबलीगी पंथाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत. शहरात नव्याने विविध प्रवासी दाखल झाले आहेत. त्यात केनिया, इंडोनेशीया, दक्षिण अफ्रिकेतून प्रवासी आलेले आहेत. असे 78 प्रवासी मालेगावात आहेत. त्यामुळे "कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्यात काही बेजबाबदार व्यक्तींमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com