malegaon | Sarkarnama

मालेगावला भाजपचे "एक फूल, चार माली'

संपत देवगिरे
रविवार, 23 एप्रिल 2017

नाशिक : मालेगाव महापालिकेत भाजप किंगमेंकर होऊ इच्छितोच. त्यामुळे पक्षांतराचा घाट घातला जात आहे. पालकमंत्री. पर्यटन राज्यमंत्री, शहराध्यक्ष अन्‌ इतर असे चार- चार नेते सक्रिय असल्याने सध्याची राजकीय स्थिती अन्‌ इच्छुकांची मनःस्थिती "" एक फूल चार माली "" अशी झाली आहे. 

नाशिक : मालेगाव महापालिकेत भाजप किंगमेंकर होऊ इच्छितोच. त्यामुळे पक्षांतराचा घाट घातला जात आहे. पालकमंत्री. पर्यटन राज्यमंत्री, शहराध्यक्ष अन्‌ इतर असे चार- चार नेते सक्रिय असल्याने सध्याची राजकीय स्थिती अन्‌ इच्छुकांची मनःस्थिती "" एक फूल चार माली "" अशी झाली आहे. 

राज्यात, देशांत झालेल्या बहुतांश निवडणुकांत भाजपने अन्य पक्षातील विस्कळितपणाच फायदा घेत प्रभावी नेते, पदाधिकारी, इच्छुकांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देऊन उमेदवारांची मोट बांधली. त्यामागे सत्ता, साम आणि दाम उभे केले. त्यामध्ये अन्य सर्वच पक्ष कमी पडतात. त्याचा फायदा भाजपला निवडणुका जिंकण्यात झाला. हाच पॅटर्न मालेगाव महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीतही वापरला जात आहे. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, संयुक्त जनता दलाच्या उमेदवारावर हा प्रयोग जोरात सुरू आहे.

यामध्ये हिंदूबहुल भागातून पंधरापेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत कोण बसवायचे याचे सूत्रे आपल्याकडे घेण्यासाठी "किंगमेकर" होण्याचे त्यांचे नियोजन आहे. 
सध्या माजी महापौर सखाराम घोडके, नरेंद्र पवार हे दोन मोठे मासे त्यांच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत. मात्र येथे निवडणूक एक अन्‌ सत्ताकेंद्र चार अशी स्थिती आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल, शहराध्यक्ष सुनील गायकवाड आणि अद्वय हिरे हे चार नेते, आपल्याच माध्यमातूनच पक्षप्रवेश व्हावेत आणि यशाचे श्रेय मिळावेत यासाठी सूत्रे हलवीत आहेत. त्यांचे समर्थक त्यासाठी दिवसरात्र अन्य पक्षांतील इच्छुकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पक्षांतराचे मनसुबे बाळगणारे मात्र "कुणाचा झेंडा घेऊ हाती" अशा गोंधळात पडलेत. त्यात मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपतील स्थिती "एक फूल चार माली' अशी आहे. त्यात श्रेय घेण्याच्या धडपडीत इच्छुकांवर राजकीय अपश्रेयाचे धनी होण्याची वेळ येते की काय असे चित्र आहे. 

मालेगाव महापालिकेत 80 पैकी कॉंग्रेस आणि तिसरा महाज यांच्याकडे प्रत्येकी 24 नगरसेवक होते. शिवसेना आघाडी 12, एम आय एम. सहभागी आघाडीचे 11, सुनील गायकवाड यांच्या शहर विकास आघाडी आणि जनता दलाचे प्रत्येकी 4 आणि अद्वय हिरे गटाचा एक नगरसेवक होता. नव्या रचनेत ही संख्या चार सदस्यीय प्रभागांतून 84 झाली आहे. यामध्ये मुस्लीमबहुल पश्‍चिम भागात 64 तर हिंदू बहुल पूर्व भागात वीस नगरसेवक आहेत. 64 जागा असलेल्या भागात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे मुबलक उमेदवार आहेत. मात्र पूर्व भागात वानवा आहे. त्यांचे अनेक नगरसेवक व इच्छुक शिवसेना, भाजपच्या उमेदवारीकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे निवडणूक रंजकतेकडे झुकली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख