सुरेश धसांना उद्या मुख्यमंत्री करा, त्यांच्य़ाशी चर्चा करतो : मुंडे

munde challenges cm
munde challenges cm

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सोळा मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आव्हाने-प्रतिआव्हाने सुरू झाली आहेत.

मुंडे यांच्या आरोपांना उत्तर देण्यास आमचे सुरेश धसच पुरेसे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यावर  ``तुमच्या सांगण्यानुसार उद्या सुरेश धस यांना मुख्यमंत्री करा, मग त्यांच्याशीही भ्रष्टाचाराविषयी चर्चा करू. मुख्यमंत्री महोदय, पण आज तुम्हालाच जबाबदारी घ्यावी लागेल. राज्यातील ११ कोटी जनतेला तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल,``असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे. या भ्रष्ट मंत्र्यांना क्लिनचिट देतांना घाबरला नाहीत, मग आता चर्चेला का घाबरता, असा सवाल मुंडे यांनी विचारला.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बीड येथे आली असता, मुख्यमंत्र्यांनी या आव्हानाला उत्तर देतांना ही चर्चा करण्यासाठी पंकजाताई सोडा तुम्हाला आमचे सुरेश धसच पुरेसे आहेत, असे उत्तर दिले होते. त्यावर आज धनंजय मुंडे यांनी पुन्हा दोन ट्विट करून मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.

राज्य सरकार मधील 16 मंत्र्यांच्या 90 हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मुंडे वारंवार उपस्थित करत आहेत. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, अशी त्यांची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com