महाराष्ट्र दिनापर्यंत राज्य 'सिंगल यूज प्लास्टिक' मुक्त करा : आदित्य ठाकरे

येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करावे, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिल्या
Aditya Thackeray Want Plastic Free Maharashtra
Aditya Thackeray Want Plastic Free Maharashtra

मुंबई : येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करावे, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिल्या. व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, की राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली असून या कामात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मोहीमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, एनएसएस, स्काऊटस्‌ ऍन्ड गाईडस्‌, स्पोर्टस्‌ क्‍लब, हाऊसिंग सोसायट्या, रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब, एनजीओ अशा विविध संस्थांचा सहभाग घेऊन याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. प्लास्टिकचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगावे. यासाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिका काय करू शकते याचा आराखडा येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

या सर्व आराखड्यांचा सर्वकष विचार करून संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचे नियोजन करण्यात येईल. यासाठी 1 मार्चला राज्यस्तरिय परिषद किंवा बैठक घेवून मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यभरात मोठी जनजागृती मोहीम तसेच प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून 1 मे पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी केल्या.

प्लास्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता सिंगल यूज प्लास्टिकमुक्त चळवळीमध्ये लोकांना सामावून घेणे आवश्‍यक आहे. सिंगल यूज प्लास्टिकमुक्तीसाठी नवनवीन कल्पना मांडाव्यात व आराखडे तयार करावेत, पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे यासाठी सहकार्य लाभेल, असे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com