भोरमधील प्रमुख इच्छुकांचे राष्ट्रवादीकडे अर्जच नाहीत; मुळशीत मात्र रस्सीखेच

भोरमधील प्रमुख इच्छुकांचे राष्ट्रवादीकडे अर्जच नाहीत; मुळशीत मात्र रस्सीखेच

नसरापूर : भोर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडे भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातून सात इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे.

मुळशीमधुन सर्वाधिक चार तर भोरमधुन एक व वेल्हेतून एकाने पक्षाकडुन लढण्याची तयारी दर्शवली आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेसाठी इच्छुकांना पक्षाकडे अर्ज करावयास सांगितले होते. त्यामध्ये भोरसाठी भोर तालुक्यातून तालुक्याचे माजी उपसभापती व मागील वेळेस विधानसभा निवडणुक लढवलेले विक्रम काशिनाथ खुटवड हे एकमेव इच्छुक आहेत. तसेच वेल्हेमधुन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान संचालक तानाजी दगडु मांगडे यांनी देखिल उमेदवारीची तयारी दर्शवली आहे.

मुळशीमधुन पक्षाकडे सर्वाधिक पाच जण इच्छुक असुन माजी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते शांताराम बाजीराव इंगवले, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व माजी तालुकाध्यक्ष शंकर हिरामण मांडेकर, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील काशिनाथ चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता सुहास दगडे व बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र राजाराम कंधारे यांनी उमेदवारी मागीतली आहे.

काँग्रेस -राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. भोरमधील काॅंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे काम केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होता. त्यामुळे भोरमध्ये आघाडीचे स्वरूप विधानसभा निवडणुकीत काय राहणार, याची उत्सुकता आहे. भोर तालुक्यात विधानसभेची तयारी करणारे आणखी काही नेते मंडळी आहेत. मात्र त्यांनीपक्षाकडे उमेदवारी का मागीतली नाही, हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com