Mahrashtra Politics Nashik Prashant Hire | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

सात कोटींच्या थकबाकीसाठी हिरेंची संस्था जप्त

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर हिरे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. जिल्हा बॅंक, महिला बॅंक, जिल्हा खरेदी विक्री संघ, सहकार भवन अशा विविध संस्थांवर या कुटुंबियांचे वर्चस्व आहे. सध्या मात्र ते भाजपमध्ये आहेत. अद्वय हिरे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असतांना व सौ. स्मिता प्रशांत हिरे रेणुकादेवी संस्थेच्या अध्यक्ष असतांना हे कर्ज मंजुर झाल्याचे बोलले जाते. कारवाईच्या शक्यतेने त्यांनी यापूर्वीच संस्थेतील पदांचे राजीनामे दिले होते.

नाशिक : साडे सात कोटींच्या थकबाकीसाठी भाजप नेते व माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेवर जिल्हा बॅंकेने जप्तीची कारवाई केली आहे. माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या परिवाराच्या आधिपत्याखालील संस्थेवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. स्मिता हिरे या संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा होत्या. सध्या संस्थेच्या संचालकांत अन्य समर्थक आहेत.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर हिरे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. जिल्हा बॅंक, महिला बॅंक, जिल्हा खरेदी विक्री संघ, सहकार भवन अशा विविध संस्थांवर या कुटुंबियांचे वर्चस्व आहे. सध्या मात्र ते भाजपमध्ये आहेत. अद्वय हिरे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असतांना व सौ. स्मिता प्रशांत हिरे रेणुकादेवी संस्थेच्या अध्यक्ष असतांना हे कर्ज मंजुर झाल्याचे बोलले जाते. कारवाईच्या शक्यतेने त्यांनी यापूर्वीच संस्थेतील पदांचे राजीनामे दिले होते. मात्र राज्यात भाजपचे सरकार, जिल्हा बॅंकेवर राज्य सहकारी बॅंकेचे शासन नियुक्त प्रशासक असतांना कारवाई झाल्याने तो राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी बॅंक प्रशासनाने मोठ्या थकीत कर्जदारांवर जप्ती व वसुलीची कार्यवाही सुरू केली आहे. या मोहिमेत आज दुपारी जिल्हा बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी एच. आर. गोसावी यांनी संस्थेला सील ठोकून कारवाई केली. हे पथक दाखल झाले तेव्हा  कारवाईस कोणीही विरोध केला नाही. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारासह तीन वेगवेगळ्या ठिकाणी कुलूप होते. कुलूप तोडून अधिकाऱ्यांनी नवी कुलपे लावली. प्रवेशद्वारावर जप्ती ताबा नोटीस व भित्तिपत्रक लावले. या संस्थेला 2012 मध्ये सात कोटी 45 लाख 59 हजार 512 रुपये कर्ज मंजूर केले होते. सध्या हे खाते थकीत (एनपीए) झाले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख