वाहने बनवण्याऱ्या `महिंद्रा'ने सुरु केले "मास्क'चे उत्पादन

असे म्हणतात संकटात माणसाची खरी ओळख होते. असाच काहीसा प्रकार जागतिक दर्जाची वाहननिर्मिती करणाऱ्या महिंद्रा उद्योग समुहाच्या बाबतीत घडले आहे. "कोरोना'शी दोन हात करतांना देशाला सर्वाधीक गरज होती व्हेंटीलेंटरची. महिंद्राने त्याची निर्मिती सुरु केली.
mahindra started production of masks at kandivali unit
mahindra started production of masks at kandivali unit

नाशिक ः असे म्हणतात संकटात माणसाची खरी ओळख होते. असाच काहीसा प्रकार जागतिक दर्जाची वाहननिर्मिती करणाऱ्या महिंद्रा उद्योग समुहाच्या बाबतीत घडले आहे. "कोरोना'शी दोन हात करतांना देशाला सर्वाधीक गरज होती व्हेंटीलेंटरची. महिंद्राने त्याची निर्मिती सुरु केली. आता त्यांनी कांदीवलीच्या प्रकल्पात सामान्यांना लागणरे जागतिक दर्जाची मास्क निर्मिती सुरु केली. त्याची एक चित्रफीत देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे "कोरोना'शी लढण्यासाठीचे एक कवच महिंद्राने सामान्यांना दिले आहे.

"कोरोना'चा संसर्ग सुरु झाल्याने देशात संचारबंदी लागू करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वप्रथम लॉकडाऊन जाहिर केले. त्यामुळे जवळपास सर्व औद्योगिक प्रकल्प खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहेत.या संधीचा लाभ घेऊन संस्थेच्या कांदीवली प्रकल्पात जागतिक दर्जाचे तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनावर उतरणारे मास्क तयार करण्याचे काम सुरु केले. त्याचे चाचणी उत्पादन यशस्वी झाले आहे. येत्या काही दिवसांत गरजेनुसार हे मास्क उपलब्ध केले जातील. त्याची सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.

सध्या "कोरोना'च्या संकटाने देशातील अनेक आरोग्यविषयक कमतरता पुढे आल्या. त्यात दरडोई रुग्णालये, खाटांची संख्या, आयसोलेश्‍य करण्यासाठीचे कक्ष, मुख्य म्हणजे व्हेंटीलेटर, मास्क, सॅनीटायझर, प्रयोगशाळा आदी आहेत. त्यात महिद्रांने हाताळम्यास सोपे, सुटसुटीत तंत्रज्ञान असलेले व जगातील सर्वात स्वस्त व्हेंटीलेटर तयार केले आहेत. त्याच्या सर्व प्रशासकीय पूर्तता पूर्ण केल्याने इगतपुरी येथील वातानुकुलीत शॉपमध्ये त्याची निर्मीती होणार आहे. त्यानंतरचा टप्पा म्हणजे त्यांनी "कोरोना'चा हल्ला परतवण्यासाठी महत्वाचे साधन किंवा सुरक्षा कवच असलेल्या मास्कची निर्मिती त्यांनी मुंबईतील कांदीवली प्रकल्पात सुरु केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com