आमदार सुमनताई पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

ध्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे सांगली जिल्ह्यातील तसेच तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासन कागदोपत्री उपलब्धता दाखवत आहे प्रत्यक्षात व्हेंटिलेटर बेड आणि अन्य सुविधांची कमतरता जाणवत आहे, असे आमदार सुमनताई पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे
MLA Sumantai Patil Demands Ventilator Beds for Tasgaon
MLA Sumantai Patil Demands Ventilator Beds for Tasgaon

पुणे : "तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी तातडीने ५० व्हेंटिलेटर बेड द्या."अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलीय. आमदार पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलेल्या पत्रात 'तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. तातडीने आम्हाला मदत करा."असे नमूद केले आहे.

"तासगाव तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. योग्य त्या सुविधा द्याव्यात."अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. "सध्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे सांगली जिल्ह्यातील तसेच तासगाव कवठेमहांकाळ  मतदारसंघातील वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासन कागदोपत्री उपलब्धता दाखवत आहे प्रत्यक्षात व्हेंटिलेटर बेड आणि अन्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि संचालक कोरोना बाधित झाल्यानंतर डायलिसिस आणि व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने जीवास मुकावे लागले. पाच ते सहा व्यक्तीच्या बाबतीत असे घडले आहे,'' असे त्यांनी नमूद केले आहे.

''आज अखेर माझ्या मतदारसंघात कोरोना बाधित ६२८ रुग्ण असून ४४ लोक मरण पावले आहेत. कोरोनाचा मृत्युदर मुंबईपाठोपाठ सांगलीत आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ मधील परिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही तालुक्यात प्रत्येकी ५० व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे.सांगली आणि मिरज येथील हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेडची सुविधा व्हावी.तासगाव कवठेमहांकाळ मध्ये कोरोना तपासणी किटची कमतरता जाणवत आहे.या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात."अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com