काश्मीरच्या दहशतग्रस्त भागात प्रथमच महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती - For the first time CRPF Shrinagar will be headed by Women officer | Politics Marathi News - Sarkarnama

काश्मीरच्या दहशतग्रस्त भागात प्रथमच महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

इतिहासात पहिल्यांदाच श्रीनगर विभागाच्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महानिरिक्षक म्हणून एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा विभाग जम्मू आणि काश्मीरमधील सर्वाधिक दहशतवादग्रस्त विभाग आहे. चारु सिन्हा असे या महिला अधिकाऱ्याचे नांव असून त्या १९९६ बॅचच्या तेलगंण कॅडरच्या अधिकारी आहेत

नवी दिल्ली : इतिहासात पहिल्यांदाच श्रीनगर विभागाच्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महानिरिक्षक म्हणून एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा विभाग जम्मू आणि काश्मीरमधील सर्वाधिक दहशतवादग्रस्त विभाग आहे. चारु सिन्हा असे या महिला अधिकाऱ्याचे नांव असून त्या १९९६ बॅचच्या तेलगंण कॅडरच्या अधिकारी आहेत.

अशी आव्हानात्मक जबाबदारी पार पाडण्याची सिन्हा यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधी त्यांनी बिहार विभागाच्या महानिरिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी तेथील नक्षलवाद्यांशी लढा दिला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नक्षलविरोधी कारवाया पार पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची बदली जम्मू क्षेत्राच्या महानिरिक्षक म्हणून झाली. आता त्यांची नियुक्ती श्रीनगर विभागाच्या महानिरिक्षक म्हणून झाली आहे. जम्मू आणि काश्मीरचे सध्याचे महासंचालक ए. पी. माहेश्वरी २००५ मध्ये श्रीनगर विभागाचे महानिरिक्षक होते. 

सीआरपीएफचा हा विभाग २००५ मध्ये सुरु करण्यात आला. या विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी यापूर्वी कुठल्याही महिला अधिकाऱ्याकडे नव्हती. हा विभाग भारतीय लष्कर व जम्मू आणि काश्मीर पोलिसांबरोबर दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे सीआरपीएफच्या महानिरिक्षकपदाची ही जबाबदारी मोठी आहे. 
(स्त्रोत - ANI Digital)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख