भाजप आमदार मेघना बोर्डीकरांना कोरोना - BJP MLA From Jintur Meghana Bordikar Found Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार मेघना बोर्डीकरांना कोरोना

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 ऑगस्ट 2020

जिंतूर- सेलू मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर (साकोरे) कोरोना पोजिटिव्ह आढळल्या आहेत. मुंबईहून पुण्याला परल्यानंतर त्यांचा स्वॅब  घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.  बोर्डीकर यांच्या पतीसह कुटूंबातील अन्य काही सदस्यही पाॅझिटिव्ह आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे

परभणी : जिंतूर- सेलू मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर (साकोरे) कोरोना पोजिटिव्ह आढळल्या आहेत. मुंबईहून पुण्याला परल्यानंतर त्यांचा स्वॅब  घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.  बोर्डीकर यांच्या पतीसह कुटूंबातील अन्य काही सदस्यही पाॅझिटिव्ह आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांतले लोकप्रतिनिधी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. कोल्हापूर दक्षिणचे कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांचा कोरोनाचा अहवाल शुक्रवारी (ता. २१ ऑगस्ट) पॉझिटिव्ह आला असतानाच आज (ता. २२ ऑगस्ट) कोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर असलेले कॉंग्रेसचे दुसरे आमदार चंद्रकांत जाधव यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जाधव यांनीच स्वतः ट्विट करून आणि सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. संपर्कातील लोकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

कोल्हापूर दक्षिणचे आमदार पाटील यांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला होता. शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग सुरू झाल्यापासून जाधव हेही शहरातील कोविड सेंटरमधील सुविधा, सीपीआरमधील डॉक्‍टरांबरोबरच रूग्णांना येणाऱ्या अडचणी, महापालिकेच्या नियोजनात आघाडीवर होते. स्वतःची काळजी घेत त्यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात आघाडीची भूमिका घेतली होती. 

चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण युवा आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत ते चाळीसगाव मतदार संघातून विजयी झाले आहेत. मतदार संघात सामाजिक कार्य करण्यात त्यांचा मोठा धडका आहे. कोरोना काळातही त्यांनी मतदार संघात कार्य सुरूच ठेवले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख