कांचन कुल यांना 'या'साठी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष केले : गणेश भेगडेंचा खुलासा - BJP Leader Clarifies about kancha Kul's Appointment | Politics Marathi News - Sarkarnama

कांचन कुल यांना 'या'साठी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष केले : गणेश भेगडेंचा खुलासा

भरत पचंगे
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

१०५ आमदारांचा सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा राज्यात स्वबळाच्या सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नवीन कार्यकारीणीतील पदाधिकारी जसे पक्षाची ताकद आहे तशीच जुने पदाधिकारी आणि नाराजीतून काही बोलले असतील तेही पदाधिकारी पक्षाची मोठी ताकद आहे. यासर्वांना एकत्रित घेवून पक्षाची एकहाती सत्तेची स्वप्ने आम्ही पूर्ण करणार आहोत असे भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले

शिक्रापूर  :  राज्यात १०५ आमदारांचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या पुणे जिल्हा भाजपा संघटनेतील जिल्हा कार्यकारीणी निवडी या पुढील काळात स्वबळावर सत्तेचा विचार करुनच आम्ही केल्या आहेत आणि करीत आहोत. पर्यायाने भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी कांचन कुल यांची निवड कुल परिवाराचा विरोध डावलून वरिष्ठ पातळीवरील पक्षनेतृत्वांकडून झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद म्हणून हा प्रश्न आमचेसाठी आता संपलेला असून काल राजिनामा दिलेल्या पुनम चौधरी, चित्तरंजन गायकवाड व गौरी गायकवाड यांचे राजिनामे आम्ही स्विकारलेले नसल्याचा खुलासा भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

सोमवारी (ता.१७) भाजपा नवीन जिल्हा कार्यकारीणी निवडीनंतर हवेली तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्या गौरी गायकवाड, वाहतूक स आघाडीचे नेते चित्तरंजन गायकवाड व जिल्हा सचिव पुनम सागर चौधरी यांनी बंडाची भूमिका उघडपणे मांडली. तिघांनंतर लगेच अविनाश बडदे, प्रसाद कदम, शब्बीर पठाण, रुख्मिनी चांदणे, उणाल कांबळे, निलम कोळी, सुषमा कांबळे, वसुधा केमकर आदी भाजपा युवा मोर्चा हवेली पदाधिकारी, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुका पदाधिका-यांनीही राजिनामे देवू केले होते. यात पुनम चौधरी यांनी थेट कुल यांचेवरच आक्षेप घेतले होते तर गायकवाड दांपत्यांनी थेट पक्षाचे राजिनामेच वरिष्ठांकडे सोपविले होते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, ''हवेलीतील सर्व नाराज पदाधिका-यांची आज भेट घेवून त्यांचेशी समक्ष जावून चर्चा केली. त्यांचे आक्षेप जे होते त्याबद्दल सविस्तर चर्चा केली व त्यानुसार त्यांची राजिनामे मी स्विकारत नसून त्यांनी पक्षासाठी सक्रीय राहण्याची विनंतीही मी वरिष्ठांच्या विश्वासाने त्यांचेपुढे मांडली. त्यानुसार या पुढे त्यांच्याही मतांचा आदर करुन त्यांच्या म्हणण्यानुसार काही संघटनात्मक घडामोडी या पुढील काळात होतील.'' मात्र हा विषय केवळ संघटनेचा अंतर्गत असून नाराज मंडळींनी कुठेही भाजपाला सोडलेले नाही हेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान १०५ आमदारांचा सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा राज्यात स्वबळाच्या सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नवीन कार्यकारीणीतील पदाधिकारी जसे पक्षाची ताकद आहे तशीच जुने पदाधिकारी आणि नाराजीतून काही बोलले असतील तेही पदाधिकारी पक्षाची मोठी ताकद आहे. यासर्वांना एकत्रित घेवून पक्षाची एकहाती सत्तेची स्वप्ने आम्ही पूर्ण करणार असल्याने या सर्व घडामोडींकडे वरिष्ठ पक्षीय पातळीवर चर्चेतूनच आजच्या भेटी झाल्याचेही त्यांनी यावेळी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख