पदवीधरांमध्ये सोशल मिडीयावर सर्वाधिक फॉलोअर रूपाली पाटलांचे - Among the graduates, Rupali Patel has the most followers on social media | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

पदवीधरांमध्ये सोशल मिडीयावर सर्वाधिक फॉलोअर रूपाली पाटलांचे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

बोगस मतदान करताना असा कुणी आढळला तर त्याची गय केली जाणार नाही. मनसे स्टाईलने त्याचा समाचार घेण्यात येईल, असा इशाराही अॅड. पाटील यांनी दिला आहे.

पुणे : पदवीधर उमेदवारांमध्ये सोशल मिडीयात सर्वाधिक "फॉलोअर' असलेल्या उमेदवार असल्याने या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार अॅड. रूपाली पाटील - ठोंबरे यांची सोशल मिडीयात क्रेझ आहे. पुण्यातील स्थानिक उमेदवार असण्याबरोबरच उर्वरित चारही जिल्ह्यात चांगला संपर्क असल्याचा फायदाही त्यांना होणार आहे.

अॅड. पाटील यांचे सोशल मिडीयावर लाखो फॉलोअर आहोत. त्यामुळे त्यांचा संपर्क मोठा आहे. हा संपर्क केवळ या निवडणुकांपुरता नाही, तर संपर्कातील सातत्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या संपर्काचा फायदा अॅड. पाटील यांना निश्‍चितपणे होऊ शकतो. बोगस मतदानाची शक्‍यता असून या प्रकाराची तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी अॅड. पाटील यांनी शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय आधिकारी सौरभ राव यांना दिले होते. त्यांनी दिलेल्या या वस्तुस्थितीजन्य माहितीमुळे संपूर्ण मतदारसंघात आज एकच खळबळ उडाली.

बोगस मतदान करताना असा कुणी आढळला तर त्याची गय केली जाणार नाही. मनसे स्टाईलने त्याचा समाचार घेण्यात येईल, असा इशाराही अॅड. पाटील यांनी दिला आहे. "सरकारनामा'शी बोलताना त्या म्हणाल्या, "मतदानादिवशी यावर आपण लक्ष ठेवणार असून, बोगस मतदान करताना कुणी आढळले, तर त्याची गय केली जाणार नाही. अत्यंत नियोजनपूर्वक हे काम करण्यात आले आहे. यातून मतदान वाढविण्याचा प्रयत्न भाजपाकडून होऊ शकतो. या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची विनंती आज विभागीय आयुक्त व पुणे पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक आधिकारी सौरभ राव यांना केली आहे.''

सोशल मिडीयाबरोबरच प्रत्यक्ष प्रचारात घेतलेली आघाडी हे अॅड. पाटील यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रचाराचा धडाका लावल्याने संपूर्ण मतदारसंघात अॅड. पाटील यांची चांगले वातावरण निर्माण केले आहे. या वातावरणाचा फायदा मतदानात निश्‍चित होऊ शकतो. सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्या मतदार तरूण-तरूणींचा मोठा पाठिंबा हे अॅड. पाटील यांची सर्वात जमेची बाजू आहे.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख