वाई-धोम हत्याकांडातील माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला सुनावणीवेळी आली चक्कर

उलटतपास सुरू केला. त्या वेळी माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला न्यायालयात अचानक चक्कर आली. त्यात ती काही काळ बेशुद्धही पडली. यामुळे न्यायालयातील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.
Witness in Wai- Dhom murder case Jyoti Mandre got dizzy in court
Witness in Wai- Dhom murder case Jyoti Mandre got dizzy in court

सातारा : वाई- धोम हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे ही आज सुनावणीदरम्यान उलट तपासणी सुरू असताना चक्कर येऊन काही काळ बेशुद्ध पडली. त्यामुळे न्यायालयाने 15 मिनिटांचा ब्रेक घेऊन पुन्हा सुनावणी सुरू केली. उद्या (ता. 22) पुन्हा सुनावणी होणार आहे. 

या हत्याकांडातील प्रमुख आरोपी डॉ. संतोष पोळ याने वाई व धोम परिसरातील सहा महिला व पुरुषांचे खून केले आहेत. मंगल जेधे या महिलेच्या खुनाच्या तपासात स्थानिक गुन्हे विभागाने या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्यानंतर डॉ. पोळला अटक केली होती. ज्योतीला सरकारी पक्षातर्फे माफीची साक्षीदार करण्यात आले आहे.

सध्या जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कामकाज पाहात आहेत. आज ते न्यायालयात उपस्थित होते. सकाळी त्यांनी उलटतपास सुरू केला. त्या वेळी माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला न्यायालयात अचानक चक्कर आली. त्यात ती काही काळ बेशुद्धही पडली. यामुळे न्यायालयातील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.

ज्योतीला उठवून बसवून पाणी देण्यात आले. ती शुद्धीवर आल्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला. ज्योतीने ठीक असल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा सुनावणीला सुरवात झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या हत्याकांडाशी संबंधित असणाऱ्यांनाच न्यायालयात येण्या- जाण्याची परवानगी आहे. या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com