सातारा, कऱ्हाडात चक्काजाम आंदोलन : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीस अटक

कऱ्हाडात सर्व पक्षिय संघटनांचे आंदोलन झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण याही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
Chakkajam agitation in Satara, Karhad: Former CM's wife arrested
Chakkajam agitation in Satara, Karhad: Former CM's wife arrested

सातारा/ कराड : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज कराडमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सर्व शेतकरी संघटना व सर्व पक्षियांच्या वतीने झालेल्या या आंदोलनावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी सत्वशिला चव्हाण याही आंदोलनत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. 

कऱ्हाडात सर्व पक्षिय संघटनांचे आंदोलन झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण याही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. 

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील,  साजिद  मुल्ला, देवानंद पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, शशिराज करपे, अनिल घराळ, प्रमोद जगदाळे ॲड. समीर देसाई, संभाजीराव जगताप, उत्तमराव खबाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

या आंदोलनामुळे पुणे बेंगलोर महामार्गासह कराड शहरात येणारी वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, साताऱ्यात बॉम्बे चौकात चक्काजाम आंदोलन झाले. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, ॲड. वर्षा देशपांडे, आम आदमी पार्टीचे सागर भोगावकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, यांच्यासह कार्यकर्ते व नागरीक सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com